दोन तास उशीराने सुरु झाली ‘पेट’ ची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 09:21 PM2017-09-23T21:21:06+5:302017-09-23T21:22:34+5:30
उत्तर महाराष्ट विद्यापीठाकडून शनिवापासून पीएच.डी. पूर्व परीक्षेला जी.एच.रायसोनी इन्स्ट्यिूट मध्ये सुरुवात झाली. मात्र सकाळी ८.३० वाजेचा सामान्य ज्ञानाचा पहिला पेपर सर्व्हर डाऊनमुळे तब्बल दोन तास उशीराने घेण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२३-उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाकडून शनिवापासून पीएच.डी. पूर्व परीक्षेला जी.एच.रायसोनी इन्स्ट्यिूट मध्ये सुरुवात झाली. मात्र सकाळी ८.३० वाजेचा सामान्य ज्ञानाचा पहिला पेपर सर्व्हर डाऊनमुळे तब्बल दोन तास उशीराने घेण्यात आला. त्यामुळे दिवसभरात घेण्यात आलेल्या सर्व पेपरच्या वेळापत्रकावर याचा परिणाम झाल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.
उमविकडून २३ ते २५ सप्टेंबर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा आॅनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहे. पहिल्या पेपरसाठी ८.३० ते सकाळी १०.३० ही वेळ निश्चित करण्यात आली होती. परीक्षेसाठी विद्यार्थी परीक्षा सभागृहात आले होते. मात्र सर्व्हरला अडचणी येत असल्याने तब्बल दोन तास उशीरा म्हणजेच सकाळी १०.३० वाजता परीक्षेला सुरुवात झाली. त्यानंतर घेण्यात आलेल्या तीन पेपरच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला. रात्री ७.३० वाजेपर्यंत ही परीक्षा घेण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. पहिल्या दिवशी होणाºया पेपरसाठी १ हजार २०७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र परीक्षेला ७९४ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. तर ४१३ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. दरम्यान सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी परीक्षेच्या ठिकाणी पाहणी केली. रविवारी देखील सकाळी ८.३० वाजेपासून परीक्षा सुरु होणार आहे.