वन कर्मचाऱ्यांवर दोन वेळा दगडफेक; चार जण जखमी, गारबर्डी जंगलात रात्रीचा थरार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2023 03:50 PM2023-05-03T15:50:26+5:302023-05-03T15:50:51+5:30

गारबर्डी वनक्षेत्रात मंगळवारी रात्री काही जण ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागंरटी करत असल्याची माहिती वनविभागाला मिळाला.

Stone pelted on forest personnel twice; Four people injured, night thrill in Garbardi forest | वन कर्मचाऱ्यांवर दोन वेळा दगडफेक; चार जण जखमी, गारबर्डी जंगलात रात्रीचा थरार 

वन कर्मचाऱ्यांवर दोन वेळा दगडफेक; चार जण जखमी, गारबर्डी जंगलात रात्रीचा थरार 

googlenewsNext

- मनीष चव्हाण

पाल, जि.जळगाव :  आदिवासींनी वन कर्मचाऱ्यांवर दोन वेळा केलेल्या दगडफेकीत वनपालासह चार जण जखमी झाले आहेत. यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास पाल ता. रावेर परिसरातील गारबर्डी शिवारात घडली. 

गारबर्डी वनक्षेत्रात मंगळवारी रात्री काही जण ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागंरटी करत असल्याची माहिती वनविभागाला मिळाला. वनविभागाचे गस्ती पथक लागलीच तिथे पोहोचले.  ट्रॅक्टर जप्त करत असताना अधांरात काही जणांनी दगडफेक केली. यात वनपाल दीपक रायसिगं, वनरक्षक युवराज मराठे, वनरक्षक राजू बोदंल हे तीन जण जखमी झाले. यानंतर ट्रॅक्टर जप्त करून वनविभागाच्या आवारात नेत असताना लोहारा व कुसुंबा गावातील ६० ते ७० जणांनी अंधारात तुफान दगडफेक करीत  लाठ्या,काठ्या, कुऱ्हाडी, कोयता घेऊन वन कर्मचाऱ्यांना घेराव घातला. याचवेळी   अंधाराचा फायदा घेत काही जणांनी जप्त केलेले ट्रॅक्टर पळवून नेले. यावेळी झालेल्या झटापटीत वनरक्षक राजू बारेला याना जबर मारहाण करण्यात आली. 

या प्रकरणी कुसुंबा व लोहारा ता. रावेर पोलिसात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रावेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनपाल रवीद्रं सोनवणे, वनपाल दिपक रायसिगं, वनरक्षक युवराज मराठे, सविता वाघ, आयेशा पिजांरी, शांतीनाथ बनगे, मुकेश तडवी, राजू बोदंल, रमेश भुतेकर, वाहन चालक भास्कर पाटील यांनी घटनास्थळी पोहचत कारवाई केली.

Web Title: Stone pelted on forest personnel twice; Four people injured, night thrill in Garbardi forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव