पवन सोनवणेंच्या घरावर दगडफेक, ९ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा; दोघांना अटक

By सुनील पाटील | Published: May 11, 2024 01:53 PM2024-05-11T13:53:39+5:302024-05-11T13:53:46+5:30

जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन, गावात बंदोबस्त, धनंजय सोनवणे हे बचावसाठी घरात गेले असता फ्लॅटवर दगडफेक करुन खिडकीच्या काचा फोडल्या

Stone pelting at Pawan Sonavane's house, rioting case against 9 persons; Both were arrested | पवन सोनवणेंच्या घरावर दगडफेक, ९ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा; दोघांना अटक

पवन सोनवणेंच्या घरावर दगडफेक, ९ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा; दोघांना अटक

जळगाव : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन भिलाभाऊ सोनवणे व मोहाडीचे सरपंच धनंजय सोनवणे या दोन्ही भावांच्या घरावर दगडफेक करुन घर व वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविल्याप्रकरणी ९ जणांविरुध्द शनिवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगल तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश पुंडलिक हटकर (वय ३३) व आकाश बबन हटकर (वय २६) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मोहाडीचे सरपंच धनंजय भिलाभाऊ सोनवणे (वय ३३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता गावातील काशिनाथ गवळी यांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन दीपक हटकर, सागर हटकर, अंकुश हटकर हे मारहाण करीत असल्याच्या संदर्भात गावातून निरोप आल्याने सरपंच या नात्याने गावात गेलो असता तिघं जण गवळी यांना मारहाण करीत होते.सागर संजय सोनवणे, शशीकांत लक्ष्मण सोनवणे व मी अशांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता आम्हालाही शिवीगाळ करु लागले. थोड्या वेळाने सर्व जण तिथून निघून गेले.  

सायंकाळी साडे सात वाजता शहरातील मोहाडी रोडवरील गुरु पेट्रोलपंपाच्या समोरील ईम्पेरीयल अपार्टमेंटच्या खाली सागर संजय सोनवणे, शशीकांत लक्ष्मण सोनवणे असे बोलत असतांना त्यावेळी तेथे राजु हटकर, अंकुश हटकर, गोलू हटकर, महेंद्र हटकर, सागर हटकर, दिपक हटकर, भरत हटकर, अर्जुन हटकर, आकाश हटकर हे हातात लाठ्याकाठ्या घेवून तेथे आले आणि अचानक सर्वांना मारहाण करायला लागले.यावेळी धनंजय सोनवणे हे बचावसाठी घरात गेले असता फ्लॅटवर दगडफेक करुन खिडकीच्या काचा फोडल्या.तसेच बाहेर कारच्या काचाही फोडल्या. पोलीस घटनास्थळी येताच सर्वांनी तेथून पळ काढला, असे फिर्यादीत नमूद आहे. या गुन्ह्यात दोघांना अटक झाली आहे तर अन्य संशयितांचा शोध सुरु असल्याची माहिती तपासाधिकारी संजय पाटील यांनी दिली

Web Title: Stone pelting at Pawan Sonavane's house, rioting case against 9 persons; Both were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.