मालखेडा राखीव जंगल परिसरात रस्तालुटीच्या इराद्याने वाहनांवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:25 IST2021-06-22T17:23:49+5:302021-06-22T17:25:29+5:30
मालखेडा राखीव जंगलातून रस्त्याने जाणाऱ्या वाहनावर सोमवारी रात्री ११ ते ११.३०च्या सुमारास अज्ञातांकडून तुफान दगडफेक करण्यात आली.

मालखेडा राखीव जंगल परिसरात रस्तालुटीच्या इराद्याने वाहनांवर दगडफेक
लोकमत न्यूज नेटवर्क
वरखेडी, ता. पाचोरा : शेंदुर्णी ते जामनेर रस्त्यावर मालखेडा ते अंबे वडगाव दरम्यान असलेल्या मालखेडा राखीव जंगलातून रस्त्याने जाणाऱ्या वाहनावर सोमवारी रात्री ११ ते ११.३०च्या सुमारास अज्ञातांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. या घटनेत काही दुचाकीस्वार जखमी झाले असून एका इको कंपनीच्या सिटर गाडीवर हल्ला झाल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पहूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या दूरक्षेत्र शेंदूर्णी पोलीस व पिंपळगाव हरेश्वरचे पोलिसांनी धाव घेतली व परिस्थिती जाणून घेत तपास सुरु केल्याचे समजते. मात्र, याबाबत पोलिसात कोणताही गुन्हा मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यत दाखल करण्यात आला नव्हता.