जळगाव जिल्हा दूध संघातील बँकेत दगड टाकून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:07 PM2018-04-16T22:07:00+5:302018-04-16T22:07:00+5:30

जिल्हा दूध संघाच्या आवारातील जिल्हा बॅँकेच्या शाखेत चोरट्यांनी प्रवेश करीत दगडांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात चोरट्यांना तिजोरीचे फक्त हँडल तोडण्यात यश आले,तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने त्यातील साडे पाच लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. सोमवारी सकाळी १०.४५ वाजता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

A stone throwing stone at Jalgaon District Milk Union and trying to break the safe | जळगाव जिल्हा दूध संघातील बँकेत दगड टाकून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

जळगाव जिल्हा दूध संघातील बँकेत दगड टाकून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे तिजोरी न फुटल्याने साडे पाच लाख सुरक्षित   चोरट्यांनी सुरक्षेचे काढले वाभाडे सीसीटीव्ही कॅमेराही फोडला

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१६ : जिल्हा दूध संघाच्या आवारातील जिल्हा बॅँकेच्या शाखेत चोरट्यांनी प्रवेश करीत दगडांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात चोरट्यांना तिजोरीचे फक्त हँडल तोडण्यात यश आले,तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने त्यातील साडे पाच लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. सोमवारी सकाळी १०.४५ वाजता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.   

दोन दिवस बँक बंद होती, उघडताच चोरी झाल्याचे समजले
 जिल्हा दूध संघाच्या आवारातच जिल्हा बॅँकेची शाखा आहे. शनिवार व रविवार दोन दिवस बॅँकेला सुटी होती. त्यामुळे सोमवारीच ही बॅँक उघडली. शाखा व्यवस्थापक लक्ष्मण हेमचंद्र भोळे, त्यांचे सहकारी सकाळी १०.४५ वाजता बॅँकेत आले असता मुख्य दरवाजाचे कुलूप कडीसह तुटलेले होते तर आतमधील कपाट उघडे होते व तिजोरीचे हॅँडल तुटलेले होते. तेथेच सिमेंटचे दगड पडलेले होते. बॅँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आल्यानंतर शाखा व्यवस्थापक भोळे यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली.

सर्वात आधी कॅमेरा फोडला
चोरट्यांनी बॅँकेत प्रवेश करण्यापूर्वी खबरदारी म्हणून  सर्वात आधी समोरच्या भिंतीवर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. दोरीच्या सहाय्याने किंवा दगडाने हा कॅमेरा फोडण्यात आला असावा. भिंतीच्या शेजारी असलेल्या मेहंदीच्या झुडपात हा कॅमेरा आढळून आला. बॅँक व्यवस्थापकांनी तो बॅँकेजवळ आणला. आतमध्ये लोखंडी कपाटाचे कुलूप तोडण्यात आले आहे. या कपाटात कागदपत्रे असल्याने चोरट्यांना तेथे काहीच हाती लागले नाही.


सुरक्षा रक्षक असताना चोरी
दूध संघात कडक सुरक्षा व्यवस्था असताना बॅँक फोडण्यात आली. त्यामुळे या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संघाच्या आवारात बांधकाम सुरु आहे, शिवाय रात्री दूध घेऊन जिल्हाभरातून वाहने येतात. रात्रभर वर्दळ सुरु असताना चोरीचा प्रयत्न झाला आहे,हे विशेष. 

Web Title: A stone throwing stone at Jalgaon District Milk Union and trying to break the safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.