पारोळा येथे महामार्गावर बैलगाडी लावून शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:44 PM2020-02-28T23:44:26+5:302020-02-28T23:45:24+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बैलगाडी असलेल्या शेतकऱ्यांना टोकन न मिळाल्याने संतप्त शेतकºयांनी आपली बैलगाडी महामार्गावर आडवी लावून रास्ता रोको केला.
रावसाहेब भोसले
पारोळा, जि.जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बैलगाडी असलेल्या शेतकऱ्यांना टोकन न मिळाल्याने संतप्त शेतकºयांनी आपली बैलगाडी महामार्गावर आडवी लावून रास्ता रोको केला. यामुळे वाहनांची मोठी रांग महामार्गाच्या दोन्ही बाजूला लागल्या. अखेर पोलिसांनी शेतकºयांची समजूत काढून रास्ता रोको मागे घेतला व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ आपली बैलगाडी लावून दिली.
सूत्रांनुसार, २८ रोजी सकाळी ११.३० वाजता तालुक्यातील अनेक शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी वाहन परवड नसल्याने स्वत:च्या बैलगाडीत कापूस विक्रीसाठी आणला होता. पण कृषी उत्पन्न बाजार समितीकडून या शेतकºयांच्या बैलगाडीस टोकन देत नसल्याने सर्वच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी तुम्ही वाहनांना टोकन देत आहेत. पण आम्हाला का टोकन दिले जात नाही? असा संतप्त सवाल उपस्थित केला. आम्ही गरीब शेतकरी कापूस विक्रीला आणताना आमच्याकडून वाहनांना भाडे देण्यास पैसे नाही. मग आम्ही कापूस बैलगाडीत विक्रीसाठी आणला हा आमचा गुन्हा आहे का? व्यापाºयाच्या वाहनाना तत्काळ टोकन पुरविले जातात. खºया शेतकºयास वेठीस धरले जाते, असा संतप्त सवाल काही शेतकºयांनी उपस्थित केला.
मग टोकन मिळत नसल्याने सर्व शेतकºयांनी आपली बैलगाडी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ आशिया महामार्गावर आडवी लावून सुमारे १५ ते २० मिनिटे रास्ता रोको केला. या वेळी पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, सहाय्यक फौजदार बापू पाटील, सत्यवान पवार, सुनील पवार यांच्यासह कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकºयांची समजूत काढली व महामार्गावरून आपली बैलगाडी बाजूला केली. या रास्ता रोकोमुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली.
संतप्त शेतकºयांनी मात्र आपली बैलगाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ सोडून उन्हात बैल बांधून याबाबत संताप व्यक्त केला. कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांचा कापूस वाहनांच्या आधी मोजला जावा, अशीही मागणी शेतकºयांनी या वेळी केली.
टोकन पुस्तक संपले होते म्हणून उशिर झाला.
शेतकºयांना वाटप करण्यात येणारे टोकन पुस्तक हे शासनाकडून येते. टोकन पुस्तक संपले होते. नव्याने टोकन पुस्तक येणास उशीर झाला. म्हणून आज टोकन वाटपास उशीर झाला. टोकन पुस्तक उपलब्ध झाल्याबरोबर सर्व बैलगाडीधारकांना सर्वात आधी टोकन देण्यात आले. यामुळे थोडासा गोंधळ उडाला. शेतकरी एकूण घेण्याच्या मनस्थितीत न होते. पण दुपारी एकला सर्वांना टोकन वाटप सुरळीत चालू केले. अशी प्रतिक्रिया कृउबा सचिव रमेश चौधरी यांनी व्यक्त केली.
शेतकºयांची थट्टा
ज्या शेतकºयांसाठी पणन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या केंद्रावर व्यापाºयांचा माल सर्रास विकला जात आहे. पण शेतकºयांच्या बैलगाडीस मात्र वेठीस धरले जात आहे. उन्हात बैलगाडीसह शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. एक प्रकारे शेतकºयांची थट्टा केली जात आहे. शेतकºयांचा कोणी वाली राहिला नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी भास्कर ओंकार पाटील यांनी व्यक्त केली.