सक्तीची वीजबिल वसुली थांबवा, शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:27+5:302021-07-16T04:13:27+5:30
तळेगाव : जामनेर तालुक्यातील तळेगाव सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील विजेचा लपंडाव व सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी, अशी मागणी शिवसेनेने ...
तळेगाव : जामनेर तालुक्यातील तळेगाव सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील विजेचा लपंडाव व सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
याबाबतचे निवेदन वीज कंपनी कार्यालयात देण्यात आले. तळेगाव सबस्टेशन अंतर्गत तळेगाव, शेळगाव, चिंचखेडा त.वा, हिवरखेडा त.वा, कासली या गावांसह इतर गावांतील एक महिन्यापासून सतत दिवसरात्र विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच कोरोनाकाळात अजूनही काही कंपन्यांचे काम या भागातील तरुण गावातून ऑनलाइन करीत आहेत. आपल्या गावी येऊन त्यांनादेखील याचा त्रास व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असून विद्यार्थ्यांनादेखील या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या वेळी शिवसेना जामनेर विधानसभा क्षेत्रप्रमुख नीळकंठ पाटील, जामनेर शहरप्रमुख अतुल सोनवणे, ॲड. भरत पवार, विकास अहिरे, मोहन जोशी, योगेश वंजारी, युवासेना शहापूर पं.स. गणप्रमुख चंद्रकांत पाटील, तुकाराम गोपाळ, खुशाल पवार आदी उपस्थित होते.