सावखेडा बुद्रूक गावातून होणारी अवैध वाळू वाहतूक थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 09:41 PM2019-12-16T21:41:06+5:302019-12-16T21:41:44+5:30
निवेदन : शाळकरी मुलांना कट मारून सुसाट धावतात ट्रॅक्टर, डंपर
जळगाव- गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होवून सावखेडा बुद्रूक गावातून वाहतूक केली जात असताना ट्रॅक्टर व डंपर शाळकरी मुलांना कट मारून जात आहेत़ त्यामुळे गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या जीवीतास धोका असून गावातून होणारी अवैध वाळू थांबवावी, अशी मागणी सावखेडा बुद्रूक गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून केली आहे़
निवेदनात म्हटले की, सावखेडा बुद्रूक गावाच्या परिसरातील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतुकदारांकडून सावखेडा ते पिंप्राळा व सावखेडा ते पोदार शाळा परिसर व गिरणा पंपींग रस्ता येथून ट्रॅक्टर व डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केली जात आहे़ ट्रॅक्टर व डंपरचालकांना थांबविले असता ग्रामस्थांना शिवीगाळ केली जात असते़ त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांना ही वाहन कट मारून जातात़ त्यात दोन ते तीन जखमी सुध्दा झाले आहेत़ याबाबत तालुका पोलिसात तक्रार सुध्दा दाखल आहे़ गावकरी दहशतीखाली असून अवैध वाळू वाहतूक करणाºया सुसाट वाहनांमुळे जीवीतहानी होवू शकते़ त्यामुळे सावखेडा बुद्रुक गावातून होणारी अवैध वाळू वाहतुक थांबविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़ दरम्यान, जिल्हाधिकारी यांना सोमवारी निवेदन देण्यात आले आहे़
यांच्या आहेत स्वाक्षरी
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर हेमंत पाटील, श्रीकांत पाटील, जितेंद्र पाटील, शिवाजी पाटील, महेश पाटील, संजय पाटील, विजय पाटील, नंदु चौधरी, तुषार बागुल, आकाश सोनवणे, मधुकर थोरात, दीपक चौधरी, रूपेश चौधरी, किरण सोनवणे, अभिजीत पाटील, जयेश पाटील, दुर्गेश जाधव, शरद चौधरी, पंकज पाटील, राहुल पाटील, उमेश पाटील, लक्ष्मण पाटील आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत़