आरटीओ एजंटांचे काम बंद आंदोलन

By admin | Published: January 13, 2017 12:35 AM2017-01-13T00:35:46+5:302017-01-13T00:35:46+5:30

वाढीव फी चा निषेध : जुन्या दरानुसार फी आकारणीची मागणी, नागरिकांचे प्रचंड हाल

Stop movement of RTO agents | आरटीओ एजंटांचे काम बंद आंदोलन

आरटीओ एजंटांचे काम बंद आंदोलन

Next

भुसावळ : उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहन परवान्यासह विविध बाबींसाठी आकारले जात असलेल्या शुल्कात शासनाने भरघोस वाढ केल्याच्या निषेधार्थ शहरातील एजंटांसह मोटार स्कूल संचालकांनी गुरुवारी कामबंद आंदोलन केल़े
शहरासह तालुक्यातून विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांचे यामुळे प्रचंड हाल झाल़े शासन जो र्पयत शुल्क कमी करीत नाही तोर्पयत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही करण्यात आला़
शासनाच्या नवीन धोरणानुसार उपप्रादेशिक विभागाकडून दिल्या जाणा:या वाहन परवान्यासह परमीट तसेच अन्य बाबींसाठी आधीच्या शुल्कात प्रचंड वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ बसत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी काम बंद आंदोलन करण्यात आल़े
शहरात दर महिन्याच्या पहिल्या तीन गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे आरटीओ कॅम्पचे आयोजन केले जात़े गुरुवार, 12 रोजी कॅम्पमध्ये सहभागी होणा:या 12 एजंटांसह नऊ मोटार स्कूल संचालकांनी काम बंद आंदोलनात सहभाग नोंदवला़ फी मध्ये करण्यात आलेली वाढ अन्यायकारक असल्याने त्यात योग्य ते बदल करावेत, अशी मागणी करण्यात आली़
काम बंदमध्ये एजंट जयंत जोशी, राजेश नायडू, अन्सार शाह, असलम खान, अनिल गोटे, अनिस पिंजारी, अकिल शेख, दीपक जैन, शर्मा, वैद्य, राहुल तळेले तर ज़ेक़ेमोटार स्कूल, रजा मोटार ड्रायव्हिंग स्कूल, नॅशनल मोटार ड्रायव्हिंग स्कूल, वैष्णवी मोटार ड्रायव्हिंग स्कूल, विजयालक्ष्मी मोटार ड्रायव्हींग स्कूल, लोणारी मोटार ड्रायव्हींग स्कूल, राजेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल, जय गणेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल, जय भद्रा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक  सहभागी झाल़े
जाचक दर कमी व्हावेत
 वाहन परवाना नूतनीकरणात दर वर्षाला एक हजार रुपये दंड तसेच आरआर करताना प्रति महिना वाढीव 300 रुपये   व वाहक परवान्यामध्ये दरवर्षाला एक हजार रुपये दंड करण्यात आला आहे शिवाय  रिक्षा पासिंगसाठी लागणा:या 200 रुपयांऐवजी 400 रुपये लागणार असून प्रति दिवस 50 रुपये दंडदेखील लागणार आहेत़
संपाचा आम्हाला अडसर नाही़ नागरिकांची कामे आम्ही करीत आहेात़ गुरुवारी नागरिकांकडील 50 वाहन परवाने देण्यात आले तसेच  60 वाहक परवान्याने देण्यात आल़े वाढीव फी कमी करण्याचा अधिकार शासनाला आह़े
-राकेश रावते, मोटार वाहन निरीक्षक
शासनाने वाढवलेले दर म्हणजे एक प्रकारे पठाणी वसुलीच आह़े शासन जो र्पयत वाढीव दर कमी करत नाही तोर्पयत आमचे काम बंद आंदोलन सुरूच राहणार आह़े जाचक दर नागरिकांना अत्यंत त्रासदायक ठरत आह़े
-राजेश आऱनायडू, एजंट

Web Title: Stop movement of RTO agents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.