निंभोरा सरपंचांच्या हत्येनंतर ग्रामस्थांचा रास्ता रोको

By admin | Published: June 19, 2017 11:11 AM2017-06-19T11:11:59+5:302017-06-19T11:11:59+5:30

निंभोरा-पिंप्रीसेकम ग्रामपंचायतीचे सरपंच शालिक सोनू सोनवणे (वय 61) यांची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

Stop the path of villagers after the killing of Sarhpanch | निंभोरा सरपंचांच्या हत्येनंतर ग्रामस्थांचा रास्ता रोको

निंभोरा सरपंचांच्या हत्येनंतर ग्रामस्थांचा रास्ता रोको

Next

 ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.19 - तालुक्यातील निंभोरा-पिंप्रीसेकम ग्रामपंचायतीचे सरपंच शालिक सोनू सोनवणे (वय 61) यांची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी संतप्त होत सकाळी साडेआठ वाजेपासून आशिया महामार्ग क्रमांक 46 रोखून धरल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली तर वाहनांच्या दुतर्फा चार ते पाच किलोमीटर्पयत रांगा लागल्याचे चित्र होत़े
शालिक सोनवणे हे 15 जूनपासून घरातून बेपत्ता झाले होते तर तालुका पोलिसात याबाबत हरवल्याची नोंद करण्यात आली होती़ फेकरी उड्डाणपुलावरील पहिल्या खांबाजवळ सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नागरिकांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांनी सरगम गेटवर याबाबत माहिती कळवली़ त्यानंतर मोठय़ा प्रमाणावर ग्रामस्थांचा जमाव जमाव झाला़ अंगावरील कपडय़ांवरून हा मृतदेह निंभोरा-पिंप्रीसेकम ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच शालिक सोनवणे यांचाच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ग्रामस्थ अधिकच संतप्त झाल़े आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्यास अटक करावी व कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला़ सकाळी 11 वाजेनंतरही रास्ता रोको सुरूच असल्याने जिल्ह्यावरून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली़  

Web Title: Stop the path of villagers after the killing of Sarhpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.