सावित्री नगरातील प्रदूषण थांबवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:33 AM2020-12-12T04:33:35+5:302020-12-12T04:33:35+5:30

कोरोनामुळे आधीच नागरिकांची प्रकृती खालावली असताना, या धुरामुळे आणखीनच त्रास होत आहे. तसेच या कुटुंबासाठी शौचालयांची व्यवस्था अतिशय कमी ...

Stop pollution in Savitri city .. | सावित्री नगरातील प्रदूषण थांबवा..

सावित्री नगरातील प्रदूषण थांबवा..

Next

कोरोनामुळे आधीच नागरिकांची प्रकृती खालावली असताना, या धुरामुळे आणखीनच त्रास होत आहे. तसेच या कुटुंबासाठी शौचालयांची व्यवस्था अतिशय कमी असल्यामुळे येथील लहान मुले उघड्यावरच शौचास बसत आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून, हागणदारीमुक्त योजनेचाही बोजवारा उडाला आहे. तरी वरील सर्व परिस्थितीचा विचार करता, या नागरिकांची शहराच्या बाहेर राहण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि येथील प्रदूषण थांबविण्यात यावे, अशी मागणी रहिवासी प्रमोद कोल्हे यांच्यासह इतर रहिवाशांनी केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक पदावरून राजेंद्र झेंडे सेवानिवृत्त

जळगाव : रेल्वेच्या जळगाव स्टेशन येथील लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र झेंडे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले.त्यांनी ३९ वर्षे ७ महिने इतकी सेवा बजावली. सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा भुसावळ येथे लोहमार्गचे पोलीस निरीक्षक सुरेश सरडे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखुंडे, परमेश्वर सोंगे, तन्मय झेंडे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

इन्फो :

सर्वाधिक काळ सेवा बजावणारे पहिलेच अधिकारी :

राजेंद्र झेंडे हे पोलीस दलात १९८१ मध्ये धुळे येथे पोलीस अंमलदार म्हणून रुजू झाले. यानंतर विविध पदांवर काम करत ते पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचले होते. त्यांना या सेवा कालावधीत २०१६ मध्ये राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, पुरस्कारासह पोलीस दलातर्फे उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण १५ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी आतापर्यंत धुळे, नंदुरबार, नाशिक व जळगाव जिल्ह्यात विविध लोहमार्ग पोलीस स्टेशनला सेवा बजावली. दरम्यान, वयाच्या १९ व्या वर्षीच पोलीस दलात दाखल होऊन तब्बल ३९ वर्षे ७ महिने व २४ दिवस इतकी सेवा बजावणारे राजेंद्र झेडे हे पहिलेच अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनीही कौतुक केले.

Web Title: Stop pollution in Savitri city ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.