विजेचा लपंडाव थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:10+5:302021-07-07T04:20:10+5:30
याबाबत सविस्तर असे की, महावितरण कंपनीचे प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिक नियमित ग्राहक असून नियमित लाइटबिल भरत असतात. ...
याबाबत सविस्तर असे की, महावितरण कंपनीचे प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिक नियमित ग्राहक असून नियमित लाइटबिल भरत असतात. मात्र, काही महिन्यांपासून प्रभाक क्र. १२ येथे रोज रात्री वारंवार लाइट जात असल्याने प्रभागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात पाऊस न झाल्याने प्रचंड प्रमाणात उकाडा होत असल्याने लहान मुले व वयोवृद्धांना, आजारी असलेल्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री वीजपुरवठा बंद झाल्याने चोऱ्यासुद्धा होण्याची शक्यता आहे.
रात्री वीजपुरवठा कधीही येतो, त्यात काही वेळेस विजेचा दाब कमी असल्याने इलेक्ट्रिक वस्तूसुद्धा खराब झाल्या आहेत. वीजपुरवठा बंद झाल्यानंतर संबंधित विभागात फोन केला तर तेथे कोणीही फोनसुद्धा उचलत नाही, असे नेहमी होत असल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत प्रत्यक्षात तपासणी करून जो काही तांत्रिक बिघाड असेल, तो सुधारला जावा व वीजपुरवठा सुरळीत करावा. नियमित वीजपुरवठा देण्याची मागणी प्रभाग बारामधील नागरिकांनी केली आहे. अन्यथा, जोपर्यंत सदरील त्रास बंद होत नाही, तोपर्यंत दरमहा लाइटबिल भरणार , असा इशारा या प्रभागातील गौरव राजेंद्र वाघ, हर्षल कापडे, रेहान अली, समीर महोमद, रफिक शेख, चेतन मेहते, आकाश अग्रवाल, प्रवीण भोसले, आशिष जाधव, विशाल अग्रवाल, महोमद जुबेर, नदीम शेख, अशोक पवार, थितू मेहरा, नेहाल यादव, तुषार पवार, अभिषेक देवपूजे, नितीन वाघ, आकाश निकम अशांनी निवेदनावर सही करून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
फोटो कॅप्शन :- भुसावळ शहरातील तापीनगर परिसरात असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज कंपनी कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पावडे यांना प्रभाग क्रमांक १२ मधील रहिवासी निवेदन देताना.
फोटो - ०६/६