पारोळा येथे बस वेळेवर लागत विद्यार्थ्यांचा पुन्हा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:33 AM2020-02-13T00:33:43+5:302020-02-13T00:35:56+5:30

बस वेळेवर लागत विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.

Stop the road again of the students taking the bus time at Parola | पारोळा येथे बस वेळेवर लागत विद्यार्थ्यांचा पुन्हा रस्ता रोको

पारोळा येथे बस वेळेवर लागत विद्यार्थ्यांचा पुन्हा रस्ता रोको

googlenewsNext
ठळक मुद्देनगाव, लोणी येथील विद्यार्थ्यांनी केले आंदोलनआगार, स्थानकप्रमुखांच्या दुर्लक्षाने होतात हाल होत असल्याचा आरोप

पारोळा, जि.जळगाव : येथील बसस्थानकातून नगाव, लोणी ही पाच वाजेची बस पावणेसहा वाजेपर्यंत वेळेवर लागत नसल्याने व नेहमीची अडचण असल्याने या परिसरातील विद्यार्थ्यांनी १२ रोजी पुन्हा रास्ता रोको आंदोलन केले.
सायंकाळी पाच वाजे दरम्यान सुटणारी लोणी मार्गे कासोदा ही बस पाऊणे सहापर्यंतदेखील फलाटावर लागली नव्हती. शाळेत आलेली मुले, मुलींना घरी जाण्यास अंधार होत होता. बस वेळेवर न लागणे हे असे नेहमीचेच झाले आहे. यामुळे बुधवारी या परिसरातील विद्यार्थ्यांनी पुन्हा महामार्गावर दहा मिनिटे रस्ता रोको केला.
यावेळी पोलीस व एसटीचे काही कर्मचारी आल्याने रस्ता रोको मागे घेण्यात आला. नंतर लगेच बस सोडण्यात आली. यामुळे महामार्गावर ट्रॅफिक जाम झाली होती. तसेच येथील आगारप्रमुख व स्थानकप्रमुख हे विद्यार्थ्यांची दखल घेत नाहीत. त्यांच्या समस्या जाणून घेत नसल्याने व मनमानी काम करतात म्हणून असे प्रकार आम्हास करावे लागतात, असे विद्यार्थ्यांनी बोलून दाखविले.
साधारण चौथ्यांदा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी बससाठी रस्ता रोको केला आहे. तरीदेखील प्रशासन लक्ष देत नसल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: Stop the road again of the students taking the bus time at Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.