जळगाव बसस्थानकात आव्हाणे येथील विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:13 PM2018-08-24T12:13:31+5:302018-08-24T12:14:20+5:30

वेळेवर बस येत नसल्याने संताप

Stop the students from Jalgaon bus stand in Yehhen | जळगाव बसस्थानकात आव्हाणे येथील विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

जळगाव बसस्थानकात आव्हाणे येथील विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

Next
ठळक मुद्देअर्धातास अडविली बसएसटीच्या ९ पैकी फक्त तीनच फे-या

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे वेळेवर एसटी बस येत नाही, त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारी पावणे चार वाजता बस स्थानकात रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे १०० ते १२५ विद्यार्थ्यांनी अर्धातास बस अडविल्याने स्थानकात गोंधळ उडाला होता.
आव्हाणे येथील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी जळगावी येत असतात. सकाळपासूनच ते सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांची ये-जा सुरु असते. मात्र, महामंडळातर्फे पूर्वी सोडण्यात येत असलेल्या ९ फेऱ्यांपैकी दिवसभरात फक्त तीनच फेºया सुरु आहेत. त्याही वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. याबाबत अनेकदा तक्रार करुनही बस वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी बसस्थानकाच रास्ता रोको केला.
एसटीच्या ९ पैकी फक्त तीनच फे-या
संतप्त विद्यार्थ्यांनी शिर्डी -औरगांबाद बसचा मार्ग अडवून धरल्यावर, एकच गोंधळ निर्माण झाला. या बस मागेच आणखी चार बस असल्याने, त्यांचा देखील खोळंबा झाला होता.यावेळी शिर्डी-औरंगाबाद या बसवरील चालकाने विद्यार्थ्यांशी चढया आवाजात बाजूला होण्याची सूचना केल्याने, विद्यार्थ्यांचा पारा अधिकच चढला. बस अडवून, दहा ते पंधरा मिनिटे होऊनही महामंडळातील कुठलेही अधिकारी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी न आल्याने, विद्यार्थ्यांचा संताप अधिकच वाढला होता. यावेळी इतर खेड्यावरील विद्यार्थ्यानींही या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून, महामंडळ प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. बसस्थानकावरच विद्यार्थ्यांनी एसटी अडविल्याचे पाहून,रस्त्यावरुन ये-जा करणाºया नागरिकानींही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Web Title: Stop the students from Jalgaon bus stand in Yehhen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.