बहुळा धरणातून होणारी पाणी चोरी थांबवा
By Admin | Published: May 5, 2017 03:14 PM2017-05-05T15:14:39+5:302017-05-05T15:14:39+5:30
बहुळा धरणात सध्या 20 ते 25 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मोठय़ा प्रमाणात अवैधपणे पाणी उपसा होत असल्याने अनेक गावांच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वरखेडी ता. पाचोरा : बहुळा धरणात सध्या 20 ते 25 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मोठय़ा प्रमाणात अवैधपणे पाणी उपसा होत असल्याने अनेक गावांच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबधित विभागाने पाणीचोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
उन्हाचे चटके वाढल्याने किमान दोन महिने पाण्याची गरज भासणार आहे. बहुळा धरणातील पाणी हे दोन महिने पाणी पुरवणे गरजचे आहे. हल्ली या ठिकाणी पी.जे.रेल्वे पुलाच्या परिसरात उघडपणे वीज पंपाच्या सहाय्याने शेतीसिंचानासाठी प्रचंड प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. या धरणाच्या पाण्यावर पाचोरा शहरासह वरखेडी, भोकरी, लासुरे, सांगवी, नाईकनगर, साजगाव, बिल्दी, नंदीचे खेडगाव, हडसन, पहान, वेरुळी, गोराडखेडे, लोहारी, आर्वे या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. काही शेतक:यांनी तर या धरणाच्या पात्रात बोअरवेल करून पाण्याचा उपसा सुरु केला आहे.
बहुळा धरणातील उपलब्ध जलसाठय़ातून अशीच पाणीचोरी सुरु राहिली तर पाचोरा शहरासह अनेक गावांना पाणी टंचाई भासणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.