कापूस खरेदी थांबल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:17 AM2021-01-03T04:17:45+5:302021-01-03T04:17:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद: शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तालुक्यातील तुरखेडा शिवारात यंदा ‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु, ...

Stopping buying cotton | कापूस खरेदी थांबल्याने

कापूस खरेदी थांबल्याने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद: शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तालुक्यातील तुरखेडा शिवारात यंदा ‘सीसीआय’चे

कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु, कापूस खरेदी नियमितपणे

केली जात नसल्याने त्याचा काहीएक उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

ठराविक केंद्रांवर कापसाची खरेदी करणाऱ्या यंत्रणेच्या अनास्थेमुळे हे

केंद्र सध्या ओस पडले आहे.

‘सीसीआय’च्या माध्यमातून शेतकऱ्यांचा

कापूस खरेदी करण्यासाठी सध्या जळगाव शहरातील शिवाजीनगरात तसेच तालुक्यातील

आव्हाणे शिवारात आणि तुरखेडे शिवारात अशी पाच ठिकाणी केंद्रे का र्यान्वित

करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात आव्हाणे शिवारातील काही केंद्रे वगळता

अन्यत्र कापूस खरेदी करताना ‘सीसीआय’च्या यंत्रणेने सपशेल हात आखडता

घेतल्याचे दिसून येत आहे. विशेषतः तुरखेडे येथील खरेदी केंद्राकडे

यंत्रणेने सोयीस्कर दुर्लक्ष केले असून त्याठिकाणी आठवड्यातून एकदा कधीतरी

कापूस खरेदीचा मुहूर्त शोधला जात असल्याने परिसरातील सुमारे ५० ते ६०

गावांमधील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. जवळच्या खरेदी केंद्रावर

कापूस खरेदी केला जात नसल्याने त्यांना लांब अंतरावरील आव्हाण्याच्या खरेदी

केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेऊन जावा लागत आहे. त्यासाठी ट्रॅक्टरच्या

भाड्याचा खर्चही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. दुसरी गोष्ट

आव्हाण्यात नियमित कापूस खरेदी होत असली तरी सकाळपासून सायंकाळपर्यंत कायम

गर्दी राहत असल्याने शेतीची तातडीने कामे सोडून अनेकांना तिथे ताटकळत बसावे

लागते. प्रसंगी कापसाची राखणदारी करण्यासाठी रात्री मुक्कामीसुद्धा

थांबण्याची वेळ येते. ही स्थिती लक्षात घेता तुरखेडे येथील केंद्रावर

‘सीसीआय’च्या कापूस खरेदीला तत्काळ वेग द्यावा अन्यथा आंदोलन छेडण्यात

येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Web Title: Stopping buying cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.