वादळात शॉर्टसर्किट होऊन पाथरी येथे शेतात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:10 AM2021-05-03T04:10:59+5:302021-05-03T04:10:59+5:30
केळीसह ठिबक, पाईप खाक : एक लाख रुपयांचे नुकसान जळगाव : तालुक्यातील पाथरी शिवारात तुकाराम गंगाराम पाटील यांच्या ...
केळीसह ठिबक, पाईप खाक : एक लाख रुपयांचे नुकसान
जळगाव : तालुक्यातील पाथरी शिवारात तुकाराम गंगाराम पाटील यांच्या मालकीचे शेतात वादळामुळे इलेक्ट्रिक तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. या आगीत शेतातील केळी पिकाच्या झाडांसह ठिबक सिंचनच्या नळ्या व पीव्हीस पाईप असे एकूण एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी १ मे रोजी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील पाथरी शिवारात गट नं. १८१ याठिकाणी असलेल्या शेतात केळी पिकाची बाग लागवड करण्यात आली आहे. ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानकपणे वारा, वादळ सुरू झाले. यात शेतातून गेलेल्या वीज तारा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट होऊन यात शेताला आग आगली. या आगीत शेतातील केळीच्या झाडांसह शेतात ठेवलेल्या ठिबकच्या नळ्या, पीव्हीसी पाईप असे एकूण एक लाख रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले. याप्रकरणी प्रकाश भास्कर पाटील, वय ३४, रा. पाथरी, ता. जळगाव यांच्या खबरीवरून १ मे रोजी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक सचिन देशमुख करीत आहेत.