दोन गटात तुफान हाणामारी ; काठ्यांसह लोखंडी पाईपाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 09:03 PM2020-12-20T21:03:59+5:302020-12-20T21:04:28+5:30

चौघुले प्लॉट परिसरातील घटना : दोन जण गंभीर जखमी : परस्परविरूध्द गुन्हा दाखल

Storm fighting in two groups; Use of iron pipe with sticks | दोन गटात तुफान हाणामारी ; काठ्यांसह लोखंडी पाईपाचा वापर

दोन गटात तुफान हाणामारी ; काठ्यांसह लोखंडी पाईपाचा वापर

Next

जळगाव : पूर्ववैमनस्यातून चौघुले प्लॉट परिसरातील प्रसाद किराणाजवळ रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. यात लाकडी काठ्यांसह लोखंडी पाईपाचा वापर करण्यात आला. या हाणामारीत एक गटातील दोन जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी सायंकाळी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्परविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यात एका गटाविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल झालेला आहे.

पोलीस ठाण्यात जात होते हजेरी लावायला ; रस्त्यात अडवून केली लोखंडी पाईपाने मारहाण
पहिल्या गटातील दीपक दत्तु चौधरी याच्या फिर्यादीत म्हटले की, दीपक व त्याचा लहान भाऊ मनोज उर्फ काल्या चौधरी (रा.चौघुले प्लॉट) हे दोघं रविवारी सकाळी शनिपेठ पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी जात होते. ११.३० वाजेच्या सुमारास चौघुले प्लॉट परिसरातील हनुमान मंदिराजवळून जात असताना दोघांना हितेश संतोष शिंदे, संतोष रमेश शिंदे, आकाश संजय मराठे, संजय मराठे, माया उर्फ विक्की, पिंटू मराठे (सर्व रा. चौघुले प्लॉट) यांनी घेराव घातला. तुमचा जामीन कसा झाला? असा जाब विचारून हितेश शिंदे याने त्याच्या हातातील लाकडी काठीने मारहाण केली. नंतर पिंटू यानेही मारहाण केल्यावर आकाश मराठे याने लोखंडी पाईपाने दीपकच्या डोक्यात मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यातच मनोज हा भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना, त्याला सुध्दा इतर सर्वांनी लाथा-बुक्क्यांसह लाकडी काठीने मारहाण केली. त्यात त्याच्या हाताला दुखापती झाली. दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाल्यानंतर सर्व तेथून पसार झाले. दोघी भावांना कुटूंबियांनी जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अखेर सायंकाळी दीपक याच्या फिर्यादीवरून मारहाण करणा-यांविरूध्द मारहाणीसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमचा पहिला जामीन रिजेक्ट केला, तुला जास्त झाले का?

दुस-या गटातील हितेश संतोश शिंदे (रा. चौघुले प्लॉट) याच्या फिर्यादीत म्हटले की, रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास हितेश हा चौघुले प्लॉट परिसरातील प्रसाद किराणाजवळ उभा असताना मनोज चौधरी व त्याचा मित्र नानु बोबड्या हे त्याच्याजवळ आले. तु आमचा पहिला जामीन रिजेक्ट केला. तुला जास्त झाली आहे काय?, काल तु वाचला असे म्हणत मनोज हा हितेशला शिवीगाळ करून लागला. नंतर कानशिलात लागवली. काही वेळात दीपक चौधरी, दत्तु चौधरी तसेच राज चौधरी यांनी लाथा-बुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण केली. अखेर सायंकाळी हितेश याने दिलेल्या फिर्यादीवरून मनोज चौधरी, दत्तु चौधरी, राज चौधरी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच जणांना घेतले ताब्यात
दरम्यान, पहिल्या गटातील दोन्ही भावंडांचा शनिवारी जामीन झाला होता. आणि रविवारी पुन्हा पूर्ववैमनस्यातून भांडण झाले. तसेच पाच जणांना शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये दुस-या गटातील हितेश शिंदे, संतोष शिंदे, आकाश मराठे, संजय मराठे व पहिल्या गटातील दत्तु चौधरी यांचा समावेश आहे.

 

Web Title: Storm fighting in two groups; Use of iron pipe with sticks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.