चोपडा तालुक्याला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:14 AM2021-05-29T04:14:31+5:302021-05-29T04:14:31+5:30

चोपडा/ वर्डी : शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी दुपारी चार वाजेला अचानक आलेल्या वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळी जमीनदोस्त ...

Storm hits Chopda taluka | चोपडा तालुक्याला वादळाचा तडाखा

चोपडा तालुक्याला वादळाचा तडाखा

Next

चोपडा/ वर्डी : शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी दुपारी चार वाजेला अचानक आलेल्या वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळी जमीनदोस्त झाली. अनेक घरांवर झाडे उन्मळून पडल्याने, घरातील कुटुंबीय बालंबाल बचावले आहेत. या वादळात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. वर्डी येथील पहाडी नाल्याला अचानक पूर आला होता.

नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदार अनिल गावीत यांनी दिली. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वारा याचा फटका चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागात जास्त प्रमाणात बसला आहे. त्यात वर्डी, वेले, आखतवाडे,चहार्डी, गरताड यासह अनेक गावांना मोठ्या प्रमाणात वादळाचा फटका बसला. वेले येथील गुलाब न्हावी यांची टपरी उडून पंधरा ते वीस फुटांवर अडकली. वेले येथील बाबुलाल भिल, खटाबाई शिवराम भिल, सकवारबाई विनायक पाटील, बुधा आत्माराम पाटील, मधुकर पंडित पाटील, पांडुरंग उदा पाटील, सुनील हिंमत पाटील यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांचे या वादळामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

आडगाव व देवळी परिसरात नुकसानीचे पंचनामे

चाळीसगाव : तालुक्यात गुरुवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार धुमशान घातले. यात तालुक्यातील आडगाव व देवळी परीसरातील पिकांचे नुकसान झाल्याने, महसूल विभागातर्फे शुक्रवारी पंचनाम्याचे कामकाज सुरू होते.

कोट

चाळीसगाव तालुक्यात गुरुवारी झालेल्या पावसाने आडगाव व देवळी येथे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी संबंधित तलाठी यांना नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर नुकसानीची आकडेवारी कळणार आहे.

- विशाल सोनवणे, नायब तहसीलदार, चाळीसगाव

फोटो

Web Title: Storm hits Chopda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.