आदर्शनगरात मुक्काम करून चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Published: March 11, 2017 01:02 AM2017-03-11T01:02:20+5:302017-03-11T01:02:20+5:30

मोलकरणीमुळे घरफोडी उघड : अत्यंत वर्दळीच्या व उच्चभ्रू वस्तीतील घटना; खाद्यपदार्थांवरही ताव

Storm of the thieves by staying in the Adaranaragar | आदर्शनगरात मुक्काम करून चोरट्यांचा धुमाकूळ

आदर्शनगरात मुक्काम करून चोरट्यांचा धुमाकूळ

googlenewsNext

जळगाव : देवदर्शनासाठी मुंबईला गेलेल्या आदर्शनगरातील सेवानिवृत्त कर्मचारी  शेख शब्बीर हुसेन ताहेर अली सैफी यांच्या बंगल्यात चोरट्यांनी दोन दिवस मुक्काम करत मुद्देमाल लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी कामावर आलेल्या मोलकरणीमुळे उघडकीस आली आहे़ सैफी मुंबईला असल्याने नेमका लांबविलेला ऐवज कळू शकला नाही़ श्वान, ठसे तज्ञांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली़ विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातील फ्रिजमधील खाद्यपदार्थांवर ताव मारत हात साफ केला़ शहरातील अत्यंत पॉश व वर्दळीच्या भागात चोरट्यांन ीधुमाकूळ घातल्यान ेआश्चर्य व्यक्त होत आहे.
शब्बीर हुसेन ताहेर अली सैफी यांचा पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़ मुलगी फरिदा हिचे लग्न झाले असून ती श्रीलंका येथे आहे़ तर मुलगा अली अजगर हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो अमेरिकत  आहे़ सैफी हे पत्नीसमवेत आदर्श नगरातील सैफी विला या बंगल्यात दहा वर्षापासून वास्तव्यास आहेत़
शेजारच्या नागरिकांनी कळविली घरफोडीची माहिती
सैफी हे पत्नी समवेत दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे गेले होते़ यादरम्यान त्यांनी त्याच्याकडे घरकामाला असलेल्या मोलकरणीला बंगल्यात साफसफाई करण्याचे सांगितले होते़ त्यानुसार शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बंगल्यावर कामासाठी आली़ साफसफाईला सुरवात करण्यापूर्वी तिला बंगल्याच्या मागील बाजूस असेल्या किचनला दरवाजा उघडा दिसला़ चोरीची शंका आल्याने पाहणी केली असता खात्री झाली़ तिने शेजारी रहिवाशांना प्रकार कळविला़ शेजारच्या नागरिकांनी सैफी यांना मोबाईलवरून प्रकार कळविला़ सैफी यांनी त्यांच्या कासमवाडी परिसरातील ईश्वर कॉलनी येथील पुतण्या मुस्तफा जफर यांना घटना कळविली़ त्यांनी तातडीने बंगला गाठला़ घरातील प्रत्येक खोलीतील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला़ सहाय्यक पोलीस निरिक्षक अरविंद भोळे यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळाची पाहणी केली़ श्वान पथक तसेच ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले़

चोरटे सोडून गेले        कुदळ व पिशवी
चोरटे कुदळ तसेच सोबत आणलेली पिशवी वाशिंगरूमध्ये सोडून गेले आहेत. चोरट्यांनी घरातील शौचालयाचा वापर केल्याचे दिसून आले आहे़ यावरून चोरट्यांनी दोन दिवस घरात मुक्काम केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे़ पोलिसांनी कुदळ तसेच पिशवी जप्त केली आहे़
कुदळीच्या सहाय्याने दरवाजा तोडला
चोरट्यांनी किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ किचन, दोन बेडरूम, दोन हॉल, वाशिंग रूम या सर्व खोल्यांमधील कपाटे, बॅग तसेच साहित्य अस्ताव्यस्त केला होता़ किचनमधील कपाटांमध्येही चोरट्यांनी शोधाशोध केली़ फ्रिजमधील खाद्यपदार्थावरही ताव मारला़ फ्रिजमधील कॅडबरी अर्धी खावून अर्धी तसेच पडली होती़ वाशिंगरूमचा कुदळीच्या सहाय्याने दरवाजा तोडला़ याठिकाणी तोडलेले कुलूप ठेवले होते़ याच ठिकाणावर चोरट्यांनी सोबत आणलेली पिशवी तसेच कुदळ पोलिसांनी हस्तगत केली आहे़

Web Title: Storm of the thieves by staying in the Adaranaragar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.