पारोळा तालुक्यात पावसाची वादळी हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:15 AM2021-05-30T04:15:00+5:302021-05-30T04:15:00+5:30
सुमारे पाऊण ते एक तास पावसाने वादळी हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी हळदीच्या व लग्नाच्या कार्याचे मंडपदेखील वादळामुळे उडून ...
सुमारे पाऊण ते एक तास पावसाने वादळी हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी हळदीच्या व लग्नाच्या कार्याचे मंडपदेखील वादळामुळे उडून गेलेत. यामुळे मंडप मालकाचे मोठे नुकसान यात झाले तर भुईमूग पाल्याचेही शेतकऱ्यांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात शेवगे बु., खेडीढोक, वंजारी, भोकरबारी, बोदर्डे, विचखेडे, उंदिरखेडे यासह अन्य भागांत पावसाने वादळी हजेरी मात्र लावली. शनिवार असल्याने सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. मान्सूनपूर्व काही विद्युतीकरणाचे काम सुरू होते. दिवसभरात ३ ते ४ तास एवढा विद्युत पुरवठा सुरू होता.
सव्वापाच वाजेच्या सुमारास वादळ सुरू झाले. लगेच विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले होते. दिवसभर असह्य असा उकाडा होता. पावसाच्या आगमनाने मात्र हवेत गारवा निर्माण झाला होता.
===Photopath===
290521\29jal_14_29052021_12.jpg
===Caption===
शहरातील लवण गल्लीत शिरलेला पूर.