जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस, रामगड येथे वीज कोसळून नऊ शेळ्या ठार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 08:24 PM2023-04-07T20:24:25+5:302023-04-07T20:25:31+5:30

मुक्ताईनगर येथे आदिवासी वस्तीवर वीज पडून नऊ शेळ्या ठार झाल्या तर जामनेर तालुक्यात शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळासह गारा पडल्या.  

Stormy rains in Jalgaon district, nine killed by lightning in Ramgad | जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस, रामगड येथे वीज कोसळून नऊ शेळ्या ठार 

जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस, रामगड येथे वीज कोसळून नऊ शेळ्या ठार 

googlenewsNext

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. कर्की रामगड ता. मुक्ताईनगर येथे आदिवासी वस्तीवर वीज पडून नऊ शेळ्या ठार झाल्या तर जामनेर तालुक्यात शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळासह गारा पडल्या.  

 कर्की रामगड येथे शुक्रवारी सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास आदिवासी वस्तीवर वीज कोसळली. यात तारसिंग गुलाब भिलाले यांच्या मालकीच्या नऊ शेळ्या ठार झाल्या.  सरपंच दत्ता पाटील यांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली. 

तोंडापूर ता. जामनेर येथे दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास  चक्रीवादळासह जोरदार पाऊस झाला.  काही प्रमाणात गाराही पडल्या. काही घरांवरील पत्रे उडाली.

Web Title: Stormy rains in Jalgaon district, nine killed by lightning in Ramgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.