नाटकाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:25 PM2018-09-22T15:25:34+5:302018-09-22T15:26:46+5:30

‘लोकमत’च्या ‘मंथन’मध्ये ‘वेध नाटकाचा’ या सदरात लिहिताहेत रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी....

The story of the play | नाटकाची गोष्ट

नाटकाची गोष्ट

Next

गोष्ट तशी जुनी आहे. जुनी म्हणजे खूप जुनी आहे. मानव जेव्हा अदीम अवस्थेत होता त्या काळची. तो शिकार करून उदरनिर्वाह करीत होता. अग्नी त्याला निर्माण करता येत होता. झोपडी बांधायला तो शिकला होता.
माणसाला समूहाने राहिले तर आपण सुरक्षित राहू याचे भान आले होते. भाषा जरी अस्तित्वात आली नव्हती तरी परस्परांश्ी संवाद करण्याची कला त्याने आत्मसात केली होती. अशा काळातली ही गोष्ट आहे.
अशाच काळातल्या एका सकाळी त्या समूहातला एक तरुण शिकारीसाठी बाहेर पडला. जंगलात तो आला. सकाळपासून दुपारपर्यंत तो त्या जंगलात शिकार शोधत फिरला. पण शिकार काही मिळेना. संध्याकाळ झाली, श्ेवटी तो हताश होवून एका झाडाखाली बसला. सूर्य मावळतीकडे होता, हळूहळू अंधार पडू लागला होता, त्या तरुणाचा आता भुकेने जीव व्याकूळ झाला होता. तेवढ्यात त्याला सिंहाची डरकाळी ऐकू आली, तो सावध झाला. अचानक समोरच्या झुडपात हालचाल झाली. तो तरुण त्याच्या हातातले शस्त्र घेवून सज्ज झाला आणि प्रत्यक्ष सिंह त्याच्यासमोर आला. त्या सिंहाने त्या तरुणावर झेप घेतली. तरुण तसा सशक्त व धीराचा होता. तरुण व सिंह या दोघात तुंबळ युध्द झाले. अखेर त्या सिंहाची शिकार करण्यात तरुणाला यश् आले. त्या मृत सिंहाला खांद्यावर टाकून तो तरुण आपल्या वस्तीकडे निघाला. वस्तीवरची मंडळी चिंतेत पडली होती. सकाळचा गेलेला तो तरुण अद्याप कसा परत आला नाही म्हणून काळजीत होती. पण दुरून येत असलेला तरुण व त्याच्या खांद्यावरची श्किार पाहून त्यांनी जल्लोष केला. त्या तरुणाचे स्वागत केले. आणलेली शिकार त्यांनी ताब्यात घेवून तिच्यावर प्रक्रिय करून ती खाण्यायोग्य केली व सगळ्यांनी मिळून त्या शिकारीवर ताव मारला. आपली भूक शांत केली. भूक शांत झाल्यावर त्यांची डोकी चालायला लागली. अंधार पडू लागल्याने वस्तीच्या मधोमध शेकोटी पेटवली होती. बाजूला त्या शिकार केलेल्या सिंहाचे कातडे पडलेले ह ोते. ते कातडे पाहून त्यांच्या मनात विचार आला. या येवढ्याश पोराने हा भला मोठा सिंह मारलाच कसा? त्यांनी त्या तरुणाला विचारले पण त्याला ते काही सांगता येईना. शेवटी त्याला सुचले. त्याने ते कातडे त्याच्या मित्रास सिंहासारखे दिसेल असे पांघरून माझ्यावर त्याच्यासारखा माझ्यावर हल्ला कर असे सांगितले. त्या मित्राने ते कातडे पांघरले व तरुणावर सिंहासारखा हल्ला केला. त्या तरुणाने त्या सिंहाला कसे मारले हे करून दाखवले. त्या शेकोटी भोवती बसलेल्या सगळ्यांना ती शिकारीची गोष्ट उमजली व त्या तरुणाचे कौतुक केले जाऊ लागले.
त्या शेकोटीभोवती जे काही घडले ते जगातले पहिले नाटक होय. तो तरुण व त्याचा मित्र हे त्या नाटकातील पहिले नट. त्या शेकोटीचा प्रकाश ही त्या नाटकाची पहिली प्रकाश् योजना, त्याने पांघरलेलं कातडं ही त्या नाटकाची पहिली वेशभूषा. त्या तरुणाला त्याने श्किार कश्ी केली हे सांगताना त्याने जे काही करून दाखवले ते पहिलं नाट्य होय तर त्या श्ोकोटी भोवती जमलेले लोक हे त्या नाट्याचे पहिले साक्षीदार अर्थात प्रेक्षक होय.
अशा अभिव्यक्तीतून कलेचा जन्म होतो. नाटक म्हणजे दुसरं काय तर आपल्याला आलेला अनुभव दुसऱ्याला नाट्यकलेच्या माध्यमातून सांगणे हा होय.सर्वसाधारण माणूस जे काही मनातले आहे ते दुसºयाला सांगण्याचा आपापल्या पध्दतीने प्रयत्न करीत असतो पण सर्वसाधारण माणसाच्या तुलनेत या कलावंतांची सर्वसामान्य माणसांपेक्षा व्यक्तता ही जास्त असते आणि म्हणून ते व्यक्त होण्यासाठी कलेचे माध्यम स्वीकारतात आणि म्हणूनच या अभिव्यक्तीमुळे या कलावंतांनी हे जग सुंदर करण्यास मोलाचा हातभार लावलेला आहे यात कोणतेही दुमत नाही.

-डॉ.हेमंत कुलकर्णी, जळगाव

Web Title: The story of the play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.