विजयाच्या कहाणीत आहे भारतीय खेळाडूंची आक्रमकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:20 AM2021-08-22T04:20:28+5:302021-08-22T04:20:28+5:30

लंडन : लॉर्डस्वर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाची कहाणी ही आक्रमकता आणि दादागिरीने भरलेली आहे. टीम इंडियाचा या सामन्यात ...

The story of victory is the aggression of the Indian players | विजयाच्या कहाणीत आहे भारतीय खेळाडूंची आक्रमकता

विजयाच्या कहाणीत आहे भारतीय खेळाडूंची आक्रमकता

Next

लंडन : लॉर्डस्वर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाची कहाणी ही आक्रमकता आणि दादागिरीने भरलेली आहे. टीम इंडियाचा या सामन्यात एवढा दबदबा होता की, इंग्लंडच्या दुसऱ्या डावात नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ओली रॉबिन्सनचा रस्ता दोन भारतीय क्रिकेटपटूंनी अडविला होता. मात्र, या दोघांना रस्त्यातून बाजूला व्हा, असे सांगण्याची रॉबिन्सनची हिंमतच झाली नाही. अखेरीस भारतीय खेळाडूंनी स्वत: त्याला रस्ता दिला तेव्हाच रॉबिन्सन मैदानावर पोहोचला.

भारताने यजमान इंग्लंडला लॉर्डस् कसोटीत १५१ धावांनी मात दिली. तेव्हा मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली होती आणि दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन्ही संघाकडून बाचाबाची होत होती. इंग्लंडचा दुसरा डाव पत्त्यांप्रमाणे पडला.

९० धावांच्या स्कोअरवर सॅम कुर्रन सातव्या विकेटच्या रूपाने बाद झाला. रॉबिन्सन मैदानावर उतरला होता. मात्र, त्यावेळी बेंचवरील काही भारतीय खेळाडूंनी त्याला मैदानात जाण्यासाठी रस्ताच दिला नाही.

एका रिपोर्टनुसार रॉबिन्सन जेव्हा पॅव्हेलियनच्या पायऱ्या उतरत होता, तेव्हा ट्रॅकसूटमध्ये भारताचे काही खेळाडू मैदानात ड्रिंक्स देऊन परत येत होते. ते आणि रॉबिन्सन समोरासमोर आले. रॉबिन्सन थांबला आणि त्याने भारतीय खेळाडू बाजूला होण्याची वाट पाहिली. भारतीय खेळाडू तेथेच उभे राहिले आणि मैदानावरील भारतीय खेळाडूंचा आवेश पाहून रॉबिन्सन त्यांना बाजूला व्हा, असेदेखील सांगू शकला नाही. तो शांत उभा राहिला आणि जेव्हा भारतीय खेळाडूंनी त्याला रस्ता दिला तेव्हाच तो मैदानावर पोहोचला. काही सेकंदांच्या या घटनेने भारतीयांचा इंग्रजांवर किती दबदबा राहिला हे दाखवून दिले.

तिसऱ्या कसोटीतही राहू शकतो तणाव

कोहलीवर आरोप

या पराभवानंतर इंग्लंडचे आजी-माजी सर्वच खेळाडू हैराण झाले आहेत. माजी खेळाडू निक क्रॉम्पटन याने सरळ विराट कोहलीवरच निशाणा साधला. त्याने तर भारतीय कर्णधारावरच सर्वांत जास्त अपशब्द वापरल्याचा आरोप केला आहे.

Web Title: The story of victory is the aggression of the Indian players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.