चाळीसगाव येथे संस्कार भारतीतर्फे कथाकथन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:10 AM2019-01-21T00:10:29+5:302019-01-21T00:17:01+5:30
संस्कारभारतीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी कथाकथन स्पर्धा घेण्यात आली.
चाळीसगाव, जि.जळगाव : संस्कारभारतीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी कथाकथन स्पर्धा घेण्यात आली.
प्रथम सत्राचे उद्घाटन देवगिरी प्रांताचे नाट्य विभागप्रमुख सुनीता घाटे यांनी केले. इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी ५ वी ते ७वी व ८वी ते १०वी या दोन गटात घेण्यात आली. यात ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. एच.एच. पटेल प्राथ.विद्यालयात या स्पर्धेला सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अश्वमेध पब्लिक स्कूलच्या संचालिका अश्विनी पाटील होत्या. प्रास्ताविक शुभांगी संन्यासी यांनी केले. व्यासपिठावर स्पर्धेचे डॉ.नीलेश देशपांडे, सचिव रवींद्र देशपांडे, उपाध्यक्ष शंकर पाठक, कोषाध्यक्ष दिलीप संन्यासी, ज्योती पाटील उपस्थित होते. परीक्षक म्हणून विश्वास देशपांडे, सुनील पाटील, संगीता देव व माया जोशी यांनी काम पाहिले. स्नेहल सापनर व श्रावणी कोटस्थाने यांनी ध्येयगीत सादर केले.
कथाकथन स्पर्धा निकाल (लहान गट) -
प्रथम- आविष्कार मनोज चौधरी (ए.बी.हायस्कूल मुलांचे)
द्वितीय- शर्वरी अमित महाजन (पोदार विदयालय)
तृतीय- स्नेहल बाळासाहेब सापनर (ए.बी हायस्कूल मुलींचे)
उत्तेजनार्थ- तुषार चव्हाण (सामंत विद्यालय) व शैलेश पाटील (ए.बी हायस्कूल मुलांचे) यांना बक्षीस मिळाले.
मोठा गट
प्रथम- अखिलेश संभाजी पाटील (सामंत विद्यालय )
द्वितीय- काजल चंद्रकांत पाटील (ए.बी. हायस्कूल मुलींचे )
तृतीय- प्रतीक्षा सुरेंद्र चव्हाण (राष्ट्रीय कन्या शाळा)
उत्तेजनार्थ- मंथन कुमावत (ए.बी.हायस्कूल मुलांचे ) व जयदीप पाटील (सामंत विदयालय ) यांना मिळाला.
सूत्रसंचालन पर्यावरण मित्र शालिग्राम निकम यांनी, तर आभार आधार महाले यांनी मानले. यशस्वितेसाठी गीतेश कोटस्थाने, सुहासिनी पाठक, विवेक घाटे, मनीषा देशपांडे , लक्ष्मीकांत कुळकर्णी, बाळासाहेब सापनर व डॉ.प्रसाद पाठक यांनी परिश्रम घेतले.