वरणगावात पाण्यासाठी महिलांचा ठिय्या
By admin | Published: May 9, 2017 05:58 PM2017-05-09T17:58:26+5:302017-05-09T17:58:26+5:30
वरणगाव : पाणीप्रश्न गंभीर, नगरसेविका आंदोलनात सहभागी
Next
वरणगाव,दि.9- नगरपालिकेच्या प्रभाग क्र.एकमधील निम्म्या भागात पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांनी मंगळवारी दुपारी तासभर नगरपालिकेत ठिय्या मांडला.
प्रभाग क्र.एकमध्ये पाणीपुरवठा करताना प्रभागातील पिंप्राळा परिसरात पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील महिलांनी आक्रमक होत नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे त्या प्रभागाच्या नगरसेविका जागृती बढे या देखील महिलांच्या आंदोलनात सहभागी झाल्याने सत्ताधा:यांची चांगलीच अडचण झाली़
पाणीपुरवठा कर्मचा:यांना धारेवर धरत प्रभागातील सर्व ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत का होत नाही? याबाबत जाब विचारण्यात आला़
सत्ताधा:यांना घरचा अहेर
जागृती बढे या पालिकेतील सत्ताधारी नगरसेविका असून त्यांनी माङया प्रभागावर सातत्याने प्रशासनाकडून दुजाभाव करीत असल्याचा आरोप करीत नूतन पाईप लाईनची चाचणी का घेण्यात आली नाही? असा प्रश्न करीत सत्तेतील काही लोक मुद्दामून मला त्रास देण्याच्या हेतूने कर्मचा:यांना प्रभागात काम करू देत नसल्याचा आरोप केला.
याबाबत पाणीपुरवठा सभापती नितीन माळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पाईपलाईनच्या तांत्रिक अडचणीमुळे त्या भागात पाणीपुरवठा होऊ शकला नसल्याचे त्यांनी सांगितल़े