भटक्या कुत्र्यांनी घेतला महिनाभरात २६९ जणांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:21+5:302021-06-06T04:12:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरासह परिसरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरक्ष: हैदोस घातला असून महिनाभरात २६९ जणांना चावा घेऊन या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरासह परिसरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरक्ष: हैदोस घातला असून महिनाभरात २६९ जणांना चावा घेऊन या कुत्र्यांनी जखमी केले आहे. या जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपात्कालीन विभागात उपचार करण्यात आले आहेत. यात बालकांचाही समावेश आहे.
नागरिकांनी त्यांच्यासह लहान मुलांना भटक्या व पाळीव प्राण्यांपासून सावध ठेवावे. प्राणी चावल्यास तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी यावे. कुत्रा चावल्यावर जखम झाकू नका, जखम उघडीच ठेवा. स्वच्छ व भरपूर पाण्याने जखम धुवून घ्या, त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी यावे. अशा रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपात्कालीन नेत्र कक्षात उपचारार्थ दाखल करावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत देवरे यांनी केले आहे.
असे आहेत जखमी
२०२ पुरुष,
४२ महिला
२५ लहान मुले