खंबीर आईमुळेच जीवनाला कलाटणी
By admin | Published: May 14, 2017 11:23 AM2017-05-14T11:23:47+5:302017-05-14T11:23:47+5:30
आईने दिलेली शिकवण तसेच तिचा खंबीरपणा हा आयुष्याला कलाटणी देणारा ठरला
किशोर पाटील / ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 14 - संस्कार आणि शिस्त याशिवाय माणूस आयुष्यात पुढे जावू शकत नाही, मोठा होवू शकत नाही़ ही आईने दिलेली शिकवण तसेच तिचा खंबीरपणा हा आयुष्याला कलाटणी देणारा ठरला, असे जळगाव महापालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे सांगतात़
मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना जीवन सोनवणे म्हणाले की, मंदोदरीबाई असे माङया आईचे नाव. वडील शिक्षक होत़े आई-वडिलांचे लग्न झाले त्यावेळी आईचे शिक्षण अपूर्ण होत़े तीन काका, आई-वडील असा परिवार होता़ थोडक्यात एकत्र कुटूंबपध्दती होती़ एकत्र पध्दतीत संसार सांभाळून आईने शिक्षण पूर्ण केले अन् ती शिक्षिका झाली़ आई वडील दोघे शिक्षक असल्याने संस्कार आणि शिस्त या दोन्ही गोष्टीत वाढलो़ आईने खंबीरपणाने घेतलेल्या निर्णयाबाबत एक आठवण सांगतो़..1968 मध्ये चौथीत असताना परीक्षा उत्तीर्ण झाल्याने शासकीय तंत्रनिकेतनला माझा प्रवेश निश्चित झाला़ मात्र यासाठी मला नाशिकला जावे लागणार होत़े एवढय़ा लहान मुलाला घरापासून एवढय़ा दूर पाठविणार म्हणून, घरातील अनेकांनी तसेच नातेवाईकांनी विरोध केला़ मात्र आईने खंबीरपणाने निर्णय घेतला व भविष्याच्या विचार करत मला नाशिकला पाठविल़े तिचा खंबीरपणा माङया आयुष्याला कलाटणी देणारा ठरला़ जीवनाला दिशा मिळाली़ यशात हुरळून जावू नका, असे ती सांगायची नाही़ भावाला एका गणिताच्या विषयात 100 पैकी 99 गुण मिळाले होत़े मात्र तरीही आई एक मार्क कमी पडला म्हणून भावावर रागावली होती़ 99 गुण मिळाल्यापेक्षा एक गुण का कमी मिळाला त्याचा विचार केला पाहिजे, असे ती म्हणाली़ म्हणजे पुढे आयुष्यात 100 पैकी 100 गुण मिळतील़ शिस्तीशिवाय माणूस यश मिळवू शकत नाही, असे ती नेहमी सांगायची़ लाड पुरवत असताना तिने शिस्तीला प्राधान्य दिल़े नातवंडांच्या बाबतीतही तिचा हाच आग्रह होता़ वयाच्या 87 व्या वर्षी तिचे निधन झाल़े तिच्याकडून मिळालेली शिकवण आजही कायम स्मरणात आह़े संस्कार आणि शिस्तीच्या जोरावरच आम्ही तिघे भाऊ उच्च पदार्पयत पोहचू शकलो़, जीवन सोनवणे यांनी आवजरून सांगितले.