विद्यार्थ्यांसाठी परीक्षेपूर्वी ताणतणावमुक्त उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 05:10 PM2019-03-27T17:10:05+5:302019-03-27T17:12:14+5:30
भवारखेडे येथे उत्साह
धरणगाव : तालुक्यातील भवारखेडे जि.प. उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा कलागुण दर्शवणारा, ‘कलाविष्कार २०१९’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. परीक्षेपूर्वी ताणतणावमुक्त आंनदोत्सव उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे शिक्षण व क्रीडा सभापती पोपटराव भोळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी अमोल जाधव, शिक्षणविस्तार अधिकारी बाविस्कर, अशोक बिºहाडे, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर माळी, सरपंच योगिता श्यामकांत पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत माळी यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतूक केले.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे विविध कलागुणदर्शक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात प्रामुख्याने विविध गीतांवर चिमुकल्यांनी आपली बहारदार नृत्यकला, नाटीका, हगणदारीमुक्त अभियानावर आधारित एकपात्री प्रयोग व इंग्रजी नाटीका सादर केल्या. या सर्वांनी चांगलीच दाद मिळविली.
प्रास्ताविक अ.का. पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अर्चना पाटील यांनी केले. सर्व सत्कारार्थींचा सन्मान मुख्याध्यापिका जानकाबाई पवार, सिंधू कोळी व जालंदर पाटील यांनी केला. गोपाल विसावे, अभय सोनार आदींनी परिश्रम घेतले.