मेहरुण शिवारात १० किलोमीटरपर्यंत पेटला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 01:25 PM2020-04-15T13:25:25+5:302020-04-15T13:25:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मेहरुण शिवार, उजाड कुसुंबा, एच़एल़पाटील स्कूल तसेच रायसोनी कॉलेजच्या मागील बाजू परिसरात मोठा वणवा ...

Stretch the abdomen for up to 5 kilometers in Mehrun Shivar | मेहरुण शिवारात १० किलोमीटरपर्यंत पेटला वणवा

मेहरुण शिवारात १० किलोमीटरपर्यंत पेटला वणवा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मेहरुण शिवार, उजाड कुसुंबा, एच़एल़पाटील स्कूल तसेच रायसोनी कॉलेजच्या मागील बाजू परिसरात मोठा वणवा पेटल्याची घटना मंगळवारी रात्री ९़ ३० वाजता समोर आली़ याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने भेट देत आग विझवण्यास मदत केली़ पहाटे तीन पर्यत ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते़
शहरालगतच्या एच़एल़पाटील स्कूल च्या मागील बाजूस साधारण तीन हेक्टर क्षेत्रात वणवा पेटल्याचा प्रकार घडला होता़ हा वणवा वाढत जाऊन पुढे मेहरुण शिवार तसेच या भागातील आठ ते दहा किलोमीटरच्या परिघात पोहोचला़ याठिकाणी अग्निशामन बंब पोहोचणे शक्य नसल्याने परिसरातील नागरिकांसह, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी नरवीरसिंह रावल यांच्या मार्गदर्शनात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून आग विझवण्यास मदत केली़ वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी झाडाच्या फांद्या , माती, या सहायाने वणवा नियंत्रणात आणला़ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिह रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे , योगेश गालफाडे , पप्पू ढाके , जगदीश बैरागी , सुरेंद्र नारखेडे , दीपक पाटील ,अझीम काझी यांनी निंबाच्या फांद्या आणि इतर जास्त पाने असलेल्या झाडांच्या फांद्या तोडून माती टाकून त्या द्वारे सदरील सम्पूर्ण वणवा विझवला़
आग विझवण्यासाठी जळगाव महापालिकेचा अग्निशमन बंब व जैन इरिगेशन चे अग्निशमन बंब दाखल झाले होते़ त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले़ अग्निशामन दलाच्या कर्मचाºयांी या भागातील गाड रस्ता आणि दुचाकींसाठीचा रस्त्यावरुन पायी फिरुन आग विझवण्याचा प्रयत्न केला़ आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही़

Web Title: Stretch the abdomen for up to 5 kilometers in Mehrun Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.