रस्ता दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन

By Admin | Published: January 11, 2017 12:47 AM2017-01-11T00:47:15+5:302017-01-11T00:47:15+5:30

तीन कि.मी. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी वाघोदा व सावदा येथील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामोर ठिय्या आंदोलन

Stretch movement for road repair | रस्ता दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन

रस्ता दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन

googlenewsNext


सावदा/वाघोदा : सावदा ते वाघोदा या तीन कि.मी. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी वाघोदा व सावदा येथील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामोर ठिय्या आंदोलन करून प्रशानाला जाब विचारला त्यामुळे बांधकाम विभागाच्या येथील प्रशासनांमध्ये मोठी खळबळ उडाली. अखेर नमते घेत संबंधित विभागाच्या अधिका:यांनी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबत आश्वासन दिल्याने आंदोलनाची सांगता झाली.
वाघोदा-सावदा या रस्त्याची  दुरवस्था झाली आहे. यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. यात काही जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. या रस्त्याचे दुरुस्तीबाबत अनेक वेळा निवेदनेदेखील देण्यात आली मात्र संबंधित ठेकेदार  काम सुरू करीत नव्हता रस्त्याचे काम अपूर्ण होते त्यामुळे वाघोदा व सावदा परिसरातील नागरिकांनी याबाबत 10 रोजी सकाळी 11 वा सावदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
  रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली वेळोवेळी निवदने देऊनसुद्धा काम सुरू होत नाही. सुमारे नऊ महिन्यांपासून हे काम रखडलेले आहे. अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. राजकीय दबाव असल्याने हे काम सुरू केले जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एन.पाटील, शाखा अभियंता रवींद्र बाविस्कर यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली.  त्यांनी वाघोदा रस्त्याचे 955 मीटरचे जे काम मजूर आहे त्याचे काही काम झाले आहे मात्र कव्हर कोटिंग बाकी आहे यासाठी ठेकेदारास पत्र दिले आहे. येत्या दोन दिवसात  तो  काम सुरू करणार असल्याचे सांगितले.  निवेदन स्वीकारले. मात्र यानंतर देखील आंदोलकानी सावदा -यावल, सावदा-भुसावळ, वाघोद्याच्या पुढे रावेरपयर्ंत रस्ता होतो, मात्र राजकीय अनास्थेमुळे   रस्ता होत नसल्याचा आरोपदेखील या वेळी   केला. कोचूर येथील नागरिकांनी सावदा कोचूर रस्तादेखील दुरुस्तीची मागणी केली.
ठेकेदारास भ्रमणध्वनीव्दारे संपर्क
यावेळी आंदोलकांनी अधिका:यांसमोरच   ठेकेदारास भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधला. यावेळी आंदोलकांनी वाघोदा रस्त्याचे काम बंद करून दुस:या रस्त्याचे काम कसे सुरू केले असा प्रश्न विचारला. शिवाय  सावदा-वाघोदा रस्त्याचे काम केव्हा सुरू करणार असा सवालदेखील केला यावेळी फोनचा स्पीकर सुरू होता त्यावेळी ठेकेदाराने वाघोदा रस्त्याचे काम बंद करून दुस:या रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी यांनी अगोदर त्या रस्त्याचे काम करावे, असे सांगितल्याने ते सुरू केले. दोन दिवसात वाघोदा रस्त्याचे काम सुरू करतो, असे सांगितले.  (वार्ताहर)

Web Title: Stretch movement for road repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.