पूनर्वसन कामात कसूर करणा:या कंत्राटदारांवर कडक कार्यवाही करा - जिल्हाधिका:यांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 10:57 PM2017-10-07T22:57:13+5:302017-10-07T22:57:55+5:30

हतनूर प्रकल्पाने बाधीत गावातील पूनर्वसन कामे द्रूत गतीने पूर्ण करण्याच्या सूचना

Strict action against contractors: District collector: Reprieve of contractors | पूनर्वसन कामात कसूर करणा:या कंत्राटदारांवर कडक कार्यवाही करा - जिल्हाधिका:यांची तंबी

पूनर्वसन कामात कसूर करणा:या कंत्राटदारांवर कडक कार्यवाही करा - जिल्हाधिका:यांची तंबी

Next
ठळक मुद्देकंत्राटदारांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकारेल्वे उड्डाणपुलांसाठीचे संपादन तत्काळ करा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 7 - हतनूर प्रकल्पाने बाधीत झालेल्या गावांमधील ग्रामस्थांच्या भावना व समस्या जाणून घेण्यासाठी अधिका:यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन तत्काळ निर्णय घ्यावा व कामात कसूर करणा:या कंत्राटदारांवर कडक कार्यवाही करावी, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी अधिका:यांना दिल्या.
शनिवारी नियोजन भवनात पूनर्वसन प्रलंबित कामाची आढावा बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीस  माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे,   आमदार संजय सावकारे, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, भुसावळचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

कंत्राटदारांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाका
मतदार संघातील 33 गावातील हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने येथील कामे तत्काळ मार्गी लागणे गरजेचे असल्याचे या वेळी एकनाथराव खडसे म्हणाले. या गावांमधील कामे पूर्ण होत नसून निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याविषयी त्यांनी सूचना केला. कंत्राटदार कामे करीत नसतील तर कारवाई करा अन्यथा त्यांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाका, अशाही सूचना खडसे यांनी या वेळी दिल्या. 

कामे दाखवा अन्यथा कारवाईस सामोरे जा
 हतनूर प्रकल्पाने बाधीत झालेल्या गावांचे पूनर्वसनाची कामे संबंधित अधिका:यांनी द्रूत गतीने पूर्ण करावीत असे सांगून  ज्या नागरिकांनी सामाजिक भावनेतून आपल्या जमिनी दिल्या व त्यामुळे  मोठे सिंचन प्रकल्प उभारले गेले त्यांना  वेळीच न्याय देणे आपले कर्तव्य आहे. यानंतर होणा:या बैठकीत पूनर्वसन कामांच्या प्रगतीचा वेग दिसला पाहिजे अन्यथा कडक कार्यवाहीस सामोरे जावे लागेल अशा सूचनाही जिल्हाधिका:यांनी दिल्या.

 या बैठकीत भुसावळ, मुक्ताईनगर, जळगाव, रावेर तालुक्यातील एकूण 33 गावातील भुसावळ तालुक्यातील  टहाकळी, मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण, चिंचोल, चांगदेव, कोथळी, मुक्ताईनगर, घोडसगाव, चिंचखेडा, खामखेडा, मेळसांगवे, शेमळदे, पंचाणे, मुंढोळदे, उचंदे, मेंढोदे, पिंप्रीनांदू, धामंदे, अंतुर्ली, जळगाव तालुक्यातील कुंड, रावेर तालुक्यातील  मांगलवाडी, तांदलवाडी, सिंगत, पुरी, गोलवाडे,  भामलवाडी,  शिंगाडी,  कांडवेल,  ऐनपूर, निंबोल, बोहार्डे, पातोंडी, धुरखेडा, अजनाड  गावातील पुर्नवसनाबाबत गाव निहाय आढावा घेण्यात आला. यावेळी त्या-त्या गावांचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. 

रेल्वे उड्डाणपुलांसाठीचे संपादन तत्काळ करा
रावेर लोकसभा मतदार संघातील चार उड्डाणपुलांचा प्रश्नही गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मंजुरी मिळाली असताना केवळ जमीन संपादन बाकी असल्याने हे काम बाकी आहे. त्यामुळे ते तत्काळ मार्गी लावण्यात यावे, अशा सूचना खासदार रक्षा खडसे यांनी या वेळी दिल्या. सावदा, निंभोरा, बोदवड, रावेर येथील हे पूल असून त्यांचे काम तत्काळ मार्गी लावावे, असेही त्यांनी सूचित केले. 

Web Title: Strict action against contractors: District collector: Reprieve of contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.