चोपडा नगर परिषदेविरुद्ध कठोरा शेतकऱ्यांनी दंड थोपटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:13 AM2021-05-31T04:13:28+5:302021-05-31T04:13:28+5:30
चोपडा नगरपरिषदेने कठोरा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनकडून कोणतीही रितसर परवानगी घेतलेली नाही. तरीही गावातून पाईपलाईन टाकण्याचा घाट बांधला जातो आहे. ...
चोपडा नगरपरिषदेने कठोरा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनकडून कोणतीही रितसर परवानगी घेतलेली नाही. तरीही गावातून पाईपलाईन टाकण्याचा घाट बांधला जातो आहे. या कामासाठी चोपडा नगरपरिषदेकडून कठोरा ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना वापरून धमक्या देण्यात येत आहेत, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जोपर्यंत ग्रामस्थांच्या मागण्या या कराराच्या स्वरूपात मान्य होत नाहीत, तोपर्यंत समस्त ग्रामस्थ या कामास कायमस्वरूपी विरोध करणार आहेत. तसेच जोपर्यंत या विषयावर शासनाकडून अधिकृत तोडगा निघत नाही, तोपर्यंत चोपडा नगरपालिका प्रशासनाने कठोरा ग्रामस्थांना विनाकारण मानसिक आणि प्रशासकीय त्रास देऊ नये अन्यथा त्यांच्या त्रासाच्या विरोधात गावातील शेतकरी कुटुंब आणि संपूर्ण नागरिक सामूहिक आत्महत्या करू आणि त्यास संपूर्ण जबाबदार म्हणून नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी राहतील, असा इशारा देण्यात आला आहे.
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ यांचा कामास कायमस्वरूपी विरोध असेल असे कठोरा ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाईपलाईन योजनेला अशोक पाटील, दिनेश पाटील, पंकज पाटील, दीपक पाटील, समाधान पाटील, विजय पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व शेतकरी व विशेष कठोरा गावातील सर्व तरुण मंडळींचा कडाडून विरोध आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ यांचा कामास कायमस्वरूपी विरोध असेल असे कठोरा ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केलेल्या मागण्या
१. शासन निर्णयानुसार पाणीपुरवठा योजनेसाठी जलस्रोतांचा विकास बंधनकारक आहे आणि त्यानुसार तापी नदी पात्रात बांध, धरण करणे आवश्यक आहे. परंतु नगरपालिका किंवा तापी महामंडळ यांच्याकडून जुन्या आणि नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत.
२. जर बांध/ धरण करणे शक्य नसेल तर तापी नदीपात्रात बारमाही जिवंत जलसाठा असणे बंधनकारक व्हावे, त्यासाठी तापी नदीपात्रातील कठोरा हद्दीतील डोहाचा ‘जिवंत जलसाठा आणि मृत जलसाठा’ याची व्याख्या तयार करण्यात यावी आणि त्यानुसार नदीपात्रात दिशानिर्देश लावण्यात यावेत.
३. मृत साठ्यातून पाणी उपसा करण्यास कायमस्वरूपी बंदी असावी आणि त्यासाठी कठोरा ग्रामपंचायत, चोपडा नगरपालिका आणि तापी महामंडळ यांच्यात अधिकृत करार व्हावा.
४. तापी पात्रातील पाणी उपसा यातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नातून कठोरा ग्रामपंचायतला रॉयल्टी स्वरूपात उत्पन्न द्यावे.
५. पाईपलाईनच्या कामामुळे होणाऱ्या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना काम सुरू होण्याच्या आधी देण्यात यावी.
===Photopath===
300521\30jal_13_30052021_12.jpg
===Caption===
चोपडा नगर परिषदेविरुध्द कठोरा शेतकऱ्यांनी दंड थोपटले