धर्मांतर थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:58 AM2019-08-02T11:58:30+5:302019-08-02T11:59:39+5:30

भारतीय सिंधू सभेची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

Strict steps should be taken to stop the conversion | धर्मांतर थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावी

धर्मांतर थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावी

Next

जळगाव : पाकिस्तानातील सिंधी समाज संकटात असून सिंध प्रांतात मुलींचे अपहरण करून त्यांचा धर्म बळजबरीने बदलून त्यांच्याशी विवाह करणे आदी प्रकार होत आहेत. देशातही काही ठिकाणी हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना थांबवण्साठी कठोर पावले उचलावीत तसेच पाकिस्तान सरकारवरही यासाठी दबाव आणावा, अशी मागणी भारतीय सिंधू सभेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी हे निवेदन स्विकारले. त्यात म्हटले आहे की, भारतीय सिंधू सभा १९७९ पासून अखिल भारतीय स्तरावर कार्यरत आहे. ही संघटना सेवा, संघटन आणि उच्च मूल्याचे संस्कार या माध्यमातून सिंधी समाजात एकात्म भाव जपण्याचे, तो वृद्धिंगत करण्याचे काम करीत आहे. अखंड भारताच्या झालेल्या फाळणीत आपले सर्वस्व समर्पित करून सिंधी समाज आज भारतासह जगातील विविध भागात स्थिरावला आहे. या दरम्यान, सिंधी समाजाने आपल्यावरील सनातन धमार्चे पूवार्पार संस्कार जपले असून, त्यांना आपली ओळख बनवले आहे. परंतु, वर्तमानात पाकिस्तानातील सिंधी समाज संकटात आहे. तेथील काही तत्त्व समाजाची परंपरा छेदण्याचा प्रयत्न करीत आहेत. युवा पिढीची दिशाभूल करून त्यांचे धर्मांतर घडवून आणणे, मुलींचे अपहरण करून त्यांचा धर्म बळजबरीने बदलून त्यांच्याशी विवाह करणे आदी प्रकार होत आहेत. सिंध प्रांतात अशा घटनांची संख्या मोठी आहे.
यामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समाजात भय आणि संतापाचे वातावरण आहे. भारतामधील काही वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या वृत्तांनुसार, ११ ते १५ वर्षे वयोगटातील हिंदू मुली अधिक संख्येने अशा घटनांच्या शिकार झाल्या असल्याचे आढळून आले आहे. पाकिस्तानच्या २० कोटी लोकसंख्येत हिंदू केवळ ३६ लाख आहेत. म्हणजेच १.६ टक्के. सन २०१८ ची ही आकडेवारी आहे.

-भारतामध्येही काही भागात अशा घटना घडत असून, त्याबाबत भारत सरकारने गंभीर दखल घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून योग्य ती कारवाई करावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
-शिष्टमंडळात सिंधी अकादमीचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी, माजी नगरसेवक राजकुमार अडवाणी, भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष मनोहरलाल जाधवानी, शहराध्यक्ष डॉ.मुलचंद उदासी, डॉ.संजय हिराणी, रायसिंघानी आदींचा समावेश होता.
-भारतीय सिंधू सभेची राष्ट्रीय चिंतन बैठक २७ व २८ जुलै रोजी, भोपाळ येथे झाली. देशभरातून ५१२ प्रतिनिधी उपस्थित होते.
-भारतीय सिंधू सभेची राष्ट्रीय चिंतन बैठक २७ व २८ जुलै २०१९ रोजी, भोपाळ येथे झाली. यात देशभरातून ५१२ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी धर्मांतरण आणि लव्ह जिहादच्या घटना थांबाव्यात यासाठी कठोर पावले उचलली जावीत.
-अशा घटनांची पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई संबंधितांवर करावी.यावेळी धर्मांतरण आणि लव्ह जिहादच्या घटना थांबाव्यात यासाठी कठोर पावले उचलली जावीत. अशा घटनांची पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई संबंधितांवर करावी.
- ज्यामुळे भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात यावा, असा ठराव करण्यात आला आहे.

Web Title: Strict steps should be taken to stop the conversion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.