धक्का लागल्याचा जाब विचारल्यावरून धरणगावात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:56 PM2018-10-14T22:56:03+5:302018-10-14T22:57:40+5:30
वहनोत्सवात लेझीम खेळतांना धक्का का मारला हे विचारण्याचा राग आल्याने झालेल्या वादाचे रुपातंर हाणामारीत झाले.
ठळक मुद्देवहनोत्सवात लेझीम खेळतांना लागला धक्कासात जणांनी केली दोघांना मारहाणधरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
धरणगाव : वहनोत्सवात लेझीम खेळतांना धक्का का मारला हे विचारण्याचा राग आल्याने झालेल्या वादाचे रुपातंर हाणामारीत झाले. याप्रकरणी सात जणांविरुध्द दंगलीचा व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. १३ रोजी फिर्यादी नरेश रघुनाथ चौधरी व त्याचा मित्र दिपक गोपाल चौधरी यांना आरोपींनी धक्का का मारला असे विचारल्याचा राग आल्याने सळईने मारहाण केली. याप्रकरणी रामकृष्ण मराठे ,गजानन मराठे, भुषण मराठे, कैलास मराठे, समाधान मराठे, नामदेव मराठे, राजेद्र मराठे (सर्व रा.मराठे गल्ली धरणगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.