अतिक्रमण कर्मचारी व हॉकर्समध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:45 PM2019-01-21T12:45:33+5:302019-01-21T12:45:45+5:30

विक्रेत्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार

Strike in encroachment staff and hawkers | अतिक्रमण कर्मचारी व हॉकर्समध्ये हाणामारी

अतिक्रमण कर्मचारी व हॉकर्समध्ये हाणामारी

Next
ठळक मुद्दे  एकमेकांना लाथाबुक्कयांनी मारहाण


जळगाव : शहरातील रेल्वे स्टेशनजवळील अतिक्रमण हटविताना रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास खाद्य पदार्थ विक्री करणारे व मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी जावून हा वाद शांत केला. याप्रकरणी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाºयांनी दिलीप सपकाळे या विक्रेत्यांविरोधात पोलीसांकडे तक्रार दाखल केली.
शहरात ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ अंतर्गत तपासणीसाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीचे सदस्य तपासणीसाठी दाखल होणार असल्याचा पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी शहरातील बसस्थानक व रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्यावर कोणत्याही प्रकारच्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांना पाच दिवस व्यवसाय न करण्याचा सूचना दिल्या आहेत.
मात्र, रविवारी रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्यालगत दिलीप सपकाळे (रा.सुरेशदादा नगर) यांनी आपली खाद्य पदार्थ विक्रीची गाडी लावली होती. त्यामुळे सकाळी ७ वाजेच्या सुमारास अतिक्रमण विभागाच्या कर्मचाºयांनी सपकाळे यांना आपला व्यवसाय बंद करण्याचा सूचना दिल्या.
मात्र, सपकाळे यांनी आपला व्यवसाय सुरुच ठेवला. त्यानंतर दुपारी १२ वाजता अतिक्रमण विभागाचे पथक पुन्हा या ठिकाणी आल्यावर देखील या ठिकाणी खाद्य पदार्थ विक्री होत असल्याने त्यांचे साहित्य व पदार्थ जप्त केल्यानंतर सपकाळे व त्यांच्या लहान भावाने मनपा कर्मचाºयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यामुळे शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. पोलीस स्टेशनमध्येही वाद झाल्याचे सांगण्यात आले.
विक्रेत्यालाही मारहाण
विक्रेत्याकडून शिवीगाळ होत असल्याने मनपा कर्मचारी रवी कदम यांनी देखील विक्रेत्याला शिवीगाळ केली. लगेच विक्रेत्यांनी कदम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कदम यांना मारहाण होत असल्याचे पाहून चार ते पाच मनपा कर्मचाºयांनी संबधित दुकानदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच याबाबत शहर पोलीस स्टेशनला या वादाबाबत माहिती दिली. लगेच पोलीसांनी घटनास्थळी जावून हा वाद शांत केला. दरम्यान, या प्रकरणी संबिधत विक्रेत्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Strike in encroachment staff and hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.