खान्देशात बंदचे तीव्र पडसाद, भुसावळात तणावाची स्थिती, चार ते पाच जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 01:09 PM2018-01-03T13:09:30+5:302018-01-03T13:10:49+5:30

ठिकठिकाणी जाळपोळ

strike in Khandesh, four to five injured | खान्देशात बंदचे तीव्र पडसाद, भुसावळात तणावाची स्थिती, चार ते पाच जण जखमी

खान्देशात बंदचे तीव्र पडसाद, भुसावळात तणावाची स्थिती, चार ते पाच जण जखमी

Next
ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त तैनात बसफे-या रद्द

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 03- पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेचे बुधवारी खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत असून जळगावातील बाजारपेठ बंद असल्याने जिल्ह्यात दगडफेक सुरू आहे. यामध्ये भुसावळ येथे तणावाची स्थिती असून बसवर झालेल्या दगडफेकी चार ते पाच जखमी झाले आहेत. यासोबत जिल्ह्यात इतर ठिकाणीही दगडफेक सुरू असून बसेस बंद झाल्याने शालेय विद्याथ्र्यांचे हाल होत आहे. 

जळगाव शहरातील प्रमुख मार्केट असलेले महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केट  तसेच  दाणाबाजार बंद आहे. असून सुवर्णबाजारात बंदला संमिश्र प्रतिसाद आहे.  जळगाव -पाचोरा मार्गावर सर्व वाहने बंद आहेत. बंद मुळे एसटीच्या फे:यांवर परिणाम होऊन अनेक बस फे:या रद्द करण्यात आल्या आहेत.  शहरात रिक्षा  सुरळीत सुरू असून रुग्णालये, मेडिकलही सुरू आहेत. मात्र  अनेक शाळा बंद असून दहावी पूर्व परीक्षेचे पेपर रद्द करण्यात आले आहेत.  ग्रामीण भागातीलही शाळा बंद आहेत. 
जळगाव जिल्ह्यातील  भुसावळ येथे जामनेर रोडवर बसवर दगडफेक करण्यात आल्याने बसमधील चार ते पाच जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी आंदोलनकत्र्याचा मोठा जमाव जमला होता. या सोबतच नाहाटा महाविद्यालय परिसरातही दगडफेक करण्यात आली. शहरात तणावाची स्थिती असून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत सुरू आहेत. 
मुक्ताईनगर येथे  बसेस् बंद असून अद्याप दुकानेदेखील बंद आहे. शहरात शांतता आहे.  भीमसैनिकांनी मोर्चा काढला.  नागपूर मुंबई महामार्ग रोखून  रास्तारोको करण्यात आला.  किनगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. 
यावल येथे दगडफेकीत दोन बसेसचे नुकसान झाले असून  टायरची जाळपोळ करण्यात आली. 
जामनेर बंदसाठी भीमसैनिक,  सामाजिक व राजकीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून शहरात पूर्णपणे बंद आहे.  जामनेर तालक्यातील राजणी येथे रास्ता रोको करण्यात आला. 
चोपडा येथे कडकडीत बंद असून चोपडा आगाराच्या व बाहेरील आगाराच्या आलेल्या लांब पल्याच्या बसेस बंद थांबून आहेत.  यामुळे चोपडा बस स्थानकात प्रवाशांची गर्दी आहे. शहरात कोठेही अनुचित प्रकार नाही.  
बोडवड येथेही बंद असून बस स्थानक  परिसरात दगदफेक करण्यात आली.  त्यानंतर मोर्चा काढण्यात आला. 
अमळनेर येथे मूकमोर्चा काढण्यात आला. 
 धुळे शहरात सकाळपासूनच व्यापा:यांनी आपले व्यवहार बंद ठेवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट आहे. शहरातील काही शाळांनी  सुरक्षेच्या दृष्टीने  सुट्टी दिली आहे. तर काही शाळा सुरु असल्यातरी पालकांनी पाल्याना न पाठविल्याने उपस्थिती कमी आहे. बस स्थानकावरुन पोलीस बंदोबस्तात बसेस सोडल्या जात आहे.  मात्र प्रवाशांची  उपस्थिती कमी आहे. 
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे बंद पाळण्यात येत असून सर्व व्यवहार बंद आहे. बसेस्अभावी प्रवाशांचे हाल होत आहे.   भारत मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा यांच्या वतीने पिंपळनेर बंदचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार  व शांततेत बंद पाळण्याय येत आहे.  बस स्थानक परिसरात राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व घटनेचा निषेध करण्यात आला.  महामार्गावर तालुक्यातील कुसुंबा जवळ रस्त्यावर टायर जाळले. आठवडे बाजार बंद केले. महामार्गा वरील वाहतुक ठप्प झाली आहे.
दोंडाईचा येथेही कडकडीत बंद असून पोलीस संरक्षणात बस जात आहे.   बाजार समितीमध्ये खरेदी विक्री सुरु आहे. 

नंदुरबार  शहरासह जिल्ह्यात बंद शांततेत ; दळणवळण व्यवस्था सुरळीत सुरू आहे. जिल्ह्यात राज्य अनुसूचित जमाती कल्याण समिती दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. 4 जानेवारी पासून समिती 3 दिवस जिल्हा दौ:यावर येणार होती.  मात्र राज्यातील परिस्थिती पाहता समितीने आपला नंदुरबार दौरा स्थगित करत पुढे ढकलला. नेहरू चौकात आंदोलन करण्यात आले. शहादा येथे दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली. 

 

Web Title: strike in Khandesh, four to five injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.