धक्कादायक..दोन हजारांसाठी दरोडेखोरांकडून वृद्ध दाम्पत्याला मारहाण

By admin | Published: May 3, 2017 12:57 PM2017-05-03T12:57:20+5:302017-05-03T12:57:20+5:30

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील पहाटेचा थरार

Striking .. For the two thousand, the aged assaulted the elderly couple | धक्कादायक..दोन हजारांसाठी दरोडेखोरांकडून वृद्ध दाम्पत्याला मारहाण

धक्कादायक..दोन हजारांसाठी दरोडेखोरांकडून वृद्ध दाम्पत्याला मारहाण

Next

 ऑनलाईन लोकमत/लियाकत सैयद

जामनेर,जि.जळगाव - पैशासाठी माणुसकी व भावभावना गहाण ठेवणा:या चार ते पाच जणांच्या टोळीने जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील वृद्ध दाम्पत्याला बुधवारी मध्यरात्री 2  वाजेच्या सुमारास दोन हजार रुपये रोख व 90 हजारांच्या दागिन्यासाठी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
बेटावद शिवारातील शेतात बांधलेल्या घरात किसन रामकृष्ण डोंगरे (वय-80) व दगडाबाई किसन डोंगरे (वय-75) हे दाम्पत्य राहतात. बुधवारी हे दाम्पत्य अंगणात झोपलेले असताना मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास अज्ञात चार दरोडेखोर दाखल झाले. दरोडेखोरांनी पैशांची विचारणा करीत वृद्धांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली. या दाम्पत्याजवळील रोख 2 हजारांची रक्कम त्यांनी हिसकावली. त्यानंतर दरोडेखोरांची दगडाबाई डोंगरे यांच्या हातात असलेल्या चांदीच्या पाटल्या, सोन्याची अंगठी व गळ्यातील मंगळसूत्रावर नजर गेली. किसनराव डोंगरे यांनी दागिने देण्यासाठी विरोध केल्याने दरोडेखोरांनी दोघांना मारहाण करायला सुरुवात केली. अंगावर जखमा आणि त्यातून निघणारे रक्त अशा स्थितीत त्यांनी मदतीसाठी याचना केली. पहाटे 5 वाजेच्या सुमारास या दाम्पत्याचा पुतण्या या भागातून जात असताना हा प्रकार लक्षात आला. पुतण्याने गावातील नागरिकांना घटनेची माहिती दिली. सरपंच व ग्रामसेवक यांनी घटनेची पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, काही ग्रामस्थांनी जखमी दाम्पत्याला तत्काळ जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करीत उपचार सुरु केले. किसनराव डोंगरे यांच्या डोक्याला जबर मार बसला असून 28 टाके टाकण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जामनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांकडून या दाम्पत्याचे जबाब नोंदविण्याचे काम सुरु आहे.

Web Title: Striking .. For the two thousand, the aged assaulted the elderly couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.