प्राध्यापक संघटनांकडून महाविद्यालयांमध्ये जोरदार प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 05:38 PM2017-09-08T17:38:58+5:302017-09-08T17:42:29+5:30
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अधिसभेच्या विद्या परिषद, महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, व्यवस्थापन परिषद व विविध अभ्यास मंडळाच्या सदस्यांसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.खान्देशातील १८ केंद्रावर हे मतदान होणार असून, त्यासाठी प्राध्यापक संघटनाकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे.
लोकमत आॅनलाईन,
जळगाव-दि.८,उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अधिसभेच्या विद्या परिषद, महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, व्यवस्थापन परिषद व विविध अभ्यास मंडळाच्या सदस्यांसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.खान्देशातील १८ केंद्रावर हे मतदान होणार असून, त्यासाठी प्राध्यापक संघटनाकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे.
अधिसभेच्या विविध १८ जागांसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. प्राचार्य गटाच्या १० जागांसह विद्यापीठ प्राध्यापक, व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषदेच्या अनेक जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे खºया अर्थाने महाविद्यालयीन प्राध्यापक गटात जोरदार लढत होणार आहे. तर व्यवस्थापन परिषदेच्या ४ जागांसाठी देखील चांगलीच रस्सीखेच पहायला मिळणार आहे.
प्रचाराची पहिली फेरी पूर्ण
मतदानाला १० दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांकडून खान्देशातील महाविद्यालयांमध्ये जावून प्रत्यक्ष प्राध्यापकांच्या भेटी घेवून प्रचार केला जात आहे. महाविद्यालयीन प्राध्यापक गटाच्या १० जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये खरी लढत एन.मुक्टो व एन.मुक्ता या दोन संघटनांमध्ये आहे. या गटासाठी सर्वाधिक २ हजार ५२८ मतदार असल्याने त्यांच्या प्रत्यक्ष भेटीवर उमेदवारांकडून भर दिला जात आहे. दोन्ही प्राध्यापक संघटनांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असून, आता दुसºया फेरीचा प्रचार सुरु होणार आहे.
मतदान कें द्राबाबत लवकरच निश्चिती
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आहे. मतदानासाठी या तीनही जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्र असतील. कोणत्या शहरात मतदान केंद्र राहणार आहेत. हे निश्चित करण्यात आले असून, शहरातील कोणत्या महाविद्यालयात मतदान घ्यावे याबाबत अद्याप निश्चिती झाली नाही. दोन दिवसात याबाबत आढावा घेवून मतदान केंद्र निश्चित करण्यात येणार आहे. एकूण १८ मतदान केंद्रांमध्ये जळगाव जिल्ह्यात ९, धुळे ५ व नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदान केंद्र राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.