नाटय़ चळवळ जिवंत ठेवण्यासाठी धडपड

By admin | Published: June 19, 2017 01:44 PM2017-06-19T13:44:40+5:302017-06-19T13:44:40+5:30

भुसावळ येथे खान्देश नाटय़ महोत्सव झाला. यानिमित्त खान्देशातील नाटय़ चळवळीचा घेतलेला आढावा.

The struggle to keep the movement alive | नाटय़ चळवळ जिवंत ठेवण्यासाठी धडपड

नाटय़ चळवळ जिवंत ठेवण्यासाठी धडपड

Next

जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांना एकत्रितपणे खान्देश असं संबोधतात. तसं पाहिलं तर तिन्ही जिल्ह्यांना एका सूत्रात बांधता येईल अशी एकही समान बाब ठळकपणे दिसत नाही. भाषा, परंपरा, संस्कृती यात थोडय़ाफार प्रमाणात साम्य दिसून येत असलं तरी ते वरवरचे दिखावू आहे. ते एक दुस:यांशी इतके फटकून वागतात की त्यात  आपलेपणा क्वचितच जाणवतो. त्यात हा भौगोलिक प्रदेश धड विदर्भाला जोडला जातो ना मराठवाडय़ाला ना, नाशिक-मुंबईला. 

जळगाववर औरंगाबादचा प्रभाव, धुळ्याला नाशिक-मालेगाव जवळचे तर नंदुरबार सुरत शहराच्या जवळचे. ही जिल्ह्यांची शहरे भौगोलिकदृष्टय़ा एक दुस:यांपासून अलिप्त आहेत. मोठय़ा प्रमाणावर बोलली जाणारी अहिराणी भाषा मराठी साहित्यात उपेक्षितच राहिली आहे. त्या मानाने मोजक्या भूभागावर बोलली जाणारी लेवा बोली बहिणाबाईंच्या काव्यातून आणि भालचंद्र नेमाडेंच्या साहित्यातून महाराष्ट्राला परिचित आहे. त्यामुळे लेवा बोलीतील नाटके नंदुरबार-धुळ्याकडचे स्वीकारत नाही तर त्यांच्या निर्मितीचे इकडे स्वागत होत नाही. त्यामुळे  खान्देशी नाटय़ चळवळ एकत्रितपणे पुढे नेण्यासाठी काही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. त्यातल्या त्यात नाटय़ साक्षरतेच्या दृष्टीने जळगाव, भुसावळ व चाळीसगाव ही जळगाव जिल्ह्यातील गावे धुळे-नंदुरबारच्या तुलनेत उजवी आहेत. मुंबई ते भुसावळ या मराठी रेल्वे लाईनवरची ही गावे असल्याने रेल्वेतल्या अधिकारी वर्गातील कलाप्रेमींनी 1950-60च्या दशकात मुंबईहून भुसावळर्पयत तर भुसावळहून जळगाव-चाळीसगावर्पयत ङिारपत ठेवली. त्यासाठी मुंबईत होणा:या सांस्कृतिक बदलांच्या आवृत्त्या जळगाव, भुसावळात लगेच पाहायला मिळत. व्यापारिवर्ग, नोकरीनिमित्त स्थायिक लोकांचे नातेवाईक आणि प्रामुख्याने रेल्वेचा रनिंग स्टाफ हे सांस्कृतिक दुव्यांचे कार्य करत. त्यामुळे लोकप्रिय तेवढंच त्यांच्यामुळे इथर्पयत येईल. वैचारिक, प्रायोगिक, नव्या आकृतिबंधाचे किंवा मग नाटय़ चळवळीला दिशा देणारी नाटके त्या काळी मंचित करणं तर सोडा पण सामान्य प्रेक्षक म्हणून पाहायला मुश्कील होई. 
स्व. पुरुषोत्तम तळेगावकरसारखा प्रायोगिक नाटकांचा ध्यास घेतलेला अवलिया मुंबईच्या तुलनेत उशिरा का होईना आमच्या ग्रामीण भागात नाटक मंचित करून ते सादर करण्याचे धाडस करे. तेव्हा त्यांची नाटके पाहून स्थानिक रंगभिडूंचे डोळे विस्फारले जात. असेही नाटक असू शकते आणि मनोरंजनाकरता ते अंतमरुखही करते, यावर त्यांचा विश्वास बसायचा. मात्र अशी नाटके सादर करण्याचे धाडस करू शकले नाही. 
कालांतराने माहिती तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले तशी ग्रामीण, शहरी रंगभूमीतील अंतर ही कमी होऊ लागले. शहरी बदलांचे पडसाद चटकन ग्रामीण भागातही उमटू लागले. तरीही प्रयोग संख्या अद्यापही मर्यादितच आहे. याला कारणे अनेक आहेत. एवढं मात्र खरं की नाटक करणारे आणि पाहणारे यांची संख्या निश्चित वाढली आहे. 
जळगाव, भुसावळसारख्या निमशहरी भागात नाटकाच्या आशयात, तंत्रात वेगवेगळे बदल होऊ लागले आहेत. स्थानिक रंगभूमी मुंबई-पुण्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात तर हे महानगरीय रंगकर्मी त्यांना नवा सल्ला देतात. ते म्हणतात, शहरी रंगभूमीवरील जवळजवळ सर्वच विषय संपले आहेत वेगवेगळे प्रयोगही करून झालेत. उलट रंगभूमी आता ग्रामीण भागाकडे मोठय़ा अपेक्षेने पाहू लागली आहे. हे म्हणजे आम्ही आशेने त्यांच्याकडे शिकायला जातो तर ते म्हणतात, आमच्या शाळा बंद पडल्या, उलट आम्हीच तुमच्या गावात शिकायला येतोय. कदाचित त्यांचंही म्हणणं खरं असेल. कारण नाटक काही कोणाची मक्तेदारी नाही. नाटक म्हणजे जीवनानुभव अभिव्यक्त करण्याचं साधन आहे, म्हणूनच ज्या-ज्या ठिकाणी जीवन अस्तित्वात आहे त्या-त्या ठिकाणी नाटक जिवंत आहे. 
ग्रामीण भागातल्या नाटकांना भौतिक साधनांची वानवा आहे. नाटक सादर करण्यासाठी लागणारी अत्याधुनिक रंगभूमी ग्रामीण भागात उपलब्ध नाही म्हणून नाटकास प्रतिष्ठाही लाभली नाही. पोट भरलेल्यांची हौस, रिकामटेकडय़ांचा उद्योग, असं म्हणून नाटक करणा:याला हिणवलं जातं. आजही नाटक करणारा तरुण ‘हौस म्हणून कर ! वाहावत               जाऊ नको’ असे नाऊमेद करणारे संवाद ऐकतच या क्षेत्रात येतो. नाटय़ व्यवसायाची कुणालाच खात्री नाही. ग्रामीण भागात तर व्यवसाय म्हणून शक्यता नाहीच. व्यापार, उदीम, नोकरी करून फावल्या वेळात नाटक करणारे आणि अभिनय वा संबंधित क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणा:या तरुणांच्या उज्रेवर ग्रामीण नाटय़ चळवळ तगून आहे. त्यात राज्यनाटय़ स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, महाविद्यालयातील नाटय़शास्त्र विभाग यांचे मोलाचे सहकार्य आहे.  - अनिल कोष्टी

Web Title: The struggle to keep the movement alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.