संघर्ष यात्रा 15 रोजी जळगाव जिल्ह्यात येणार
By admin | Published: April 10, 2017 01:21 PM2017-04-10T13:21:06+5:302017-04-10T13:21:06+5:30
शेतक:यांना कजर्माफी मिळावी यासाठी काढण्यात आलेली संघर्ष यात्रा 15 पासून सुरु होत आहे. बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार असा यात्रेचा दुसरा टप्पा राहणार आहे.
Next
जळगाव,दि.10- काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गतकाळातील झालेल्या चुका विसरून आम्ही शेतक:यांना कजर्माफी मिळावी यासाठी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने रस्त्यावर येत आहोत. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळ असलेल्या शिंदखेडाराजापासून संघर्ष यात्रा सुरुवात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला माजी मंत्री गुलाबराव देवकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ.उल्हास पाटील, माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे, काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.अजरुन भंगाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
संघर्ष यात्रेचा असा राहिल प्रवास
संघर्ष यात्रेबाबत माहिती देतांना त्यांनी सांगितले की, शनिवार 15 रोजी सकाळी 10 वाजता शिंदखेडराजा, जि.बुलढाणा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होईल. त्यानंतर या ठिकाणी सकाळी 10.30 वाजता जाहीर सभा होणार आहे. दुपारी 1.30 वाजता चिखली येथे संघर्ष यात्रा दाखल होणार आहे. दुपारी 2.30 वाजता बुलढाणा येथे दाखल होऊन 3.30 वाजता जाहीर सभा होईल. संध्याकाळी 6 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता वरणगाव येथे जाहीर सभा होणार आहे. रविवार 16 रोजी सकाळी 9 वाजता एरंडोल येथे संघर्ष यात्रा येईल.
रविवारी सकाळी 10 वाजता पारोळा येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर संषर्घ यात्रा मोटारीने अमळनेर, बेटावद मार्गे शिरपूरकडे रवाना होईल. दुपारी 12 वाजता नरडाणा येथे आगमन होऊन संघर्ष यात्रेचे स्वागत होईल. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता शिरपूर येथे जाहीर सभा होईल.
संघर्ष यात्रेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्यासह मान्यवर नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.