तरुणांनो संघर्ष करा...आत्महत्या करू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:38+5:302021-06-03T04:12:38+5:30

दोन दिवसांपूर्वी ३० मे रोजी दोन तरुणांनी शहरात आत्महत्या केल्या. आईला मायग्रेनचा आजार, वडिलांवर कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेली व त्यात ...

Struggle young people ... don't commit suicide! | तरुणांनो संघर्ष करा...आत्महत्या करू नका !

तरुणांनो संघर्ष करा...आत्महत्या करू नका !

googlenewsNext

दोन दिवसांपूर्वी ३० मे रोजी दोन तरुणांनी शहरात आत्महत्या केल्या. आईला मायग्रेनचा आजार, वडिलांवर कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेली व त्यात स्वत:लाही मायग्रेनचा आजार जडला. त्याशिवाय लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद, त्याचा परिणाम कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर झाला. यामुळे नैराश्येत आलेल्या इम्रान खान अकील खान या २४ वर्षीय तरुणाने मेहरुणमधील शिवाजी उद्यानातील विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले. तर त्याच दिवशी रात्री खोटे नगरात किशोर भाऊलाल पाटील या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. किशोर हा मूळचा चांदसणी, ता.चोपडा येथील रहिवासी होता. स्वत: पेंटरकाम करायचा तर पत्नी खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती; मात्र लॉकडाऊनमुळे रोजगार थांबला, व्यसनाधीनता वाढली, त्याच तणावात किशोरने आत्महत्या केल्याची बोलले जात आहे. सर्वात चटका लावणारी घटना दिनेश गुलाबराव मोरे या मुलाच्या बाबतीत घडली. अवघ्या १७ व्या वर्षी त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. त्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. भुसावळच्या सुशिक्षित तरुणाने जळगावात येऊन रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. बुधवारी पहाटे अडीच वाजता हर्षल प्रेमनाथ महाजन या तरुणाने अयोध्या नगरात गळफास घेऊन तर दुपारी

संगीता प्रकाश मोहिते या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

कोरोनाने हिरावला रोजगार

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे अनेकांचा रोजगार थांबला आहे. दीड वर्षापासून कोणताच उद्योग किंवा व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, त्यामुळे अनेकांचा हाताचा रोजगार गेला. घरभाडे, दैनंदिन खर्च, आजारपण, घर संसार आदी बाबींची पूर्तता करताना अनेक जण नाकीनऊ येऊ लागले आहेत. गेल्यावर्षी देखील कोरोनाने रोजीरोटी ‌थांबल्यामुळे आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या. तरुणांच्या आत्महत्या या चिंताजनक आहेत. त्यांच्यामागे असलेले कुटुंब उघड्यावर येत आहे.

अशा आहेत शहरातील आत्महत्येच्या घटना

२८ मे : राहुल राजाराम निलम (वय ३५, मूळ रा.भुसावळ)

२९ मे : दिनेश गुलाबराव मोरे (वय १७, रा. हरिविठ्ठल नगर)

३० मे : किशोर भाऊलाल पाटील (वय ३२, रा.खोटे नगर)

३० मे : इम्रान खान अकील खान (वय २४, रा.मेहरुण)

२ जून : हर्षल प्रेमनाथ महाजन (वय २९,रा.अयोध्या नगर)

२ जून : संगीता प्रकाश मोहिते (वय ३३, रा.कुसुंबा,ता.जळगाव)

Web Title: Struggle young people ... don't commit suicide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.