बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:56 PM2018-05-31T22:56:49+5:302018-05-31T22:56:49+5:30
जळगावातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.३१ : तालुक्यातील फुपनगरी येथील प्राची चौधरी या विद्यार्थीनीने बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून विषारी द्रव्य सेवन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. या विद्यार्थीनीवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.
तालुक्यातील फुपनगरी येथील बारावीत शिकणारी विद्यार्थीनी प्राची विजय चौधरी (वय-१६) हिला बारावीच्या परीक्षेत ४८ टक्के गुण मिळाले. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण असताना बारावीत मिळालेल्या कमी गुणांमुळे विद्यार्थीनी कमालीची निराश झाली. त्यातून तिने घरात असलेले तणनाशक सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. तत्काळ उपचार करण्यात आली. आता या विद्यार्थीनीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.