हंबर्डीत विद्यार्थ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 23:00 IST2021-04-27T23:00:07+5:302021-04-27T23:00:41+5:30
अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

हंबर्डीत विद्यार्थ्यांची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
फैजपूर : हंबर्डी, ता. यावल येथील अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. उमेश हेमंत पाटील (१७ वर्ष) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
उमेश हा इयत्ता अकरावीत होता. तो भुसावळ येथे शिक्षण घेत होता. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हंबर्डी येथे राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर उमेशने गळफास लावून आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. उमेश हा पाटील परिवारातील एकुलता एक मुलगा होता.
याप्रकरणी प्रशांत पाटील यांनी खबर दिल्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, हेड कॉन्स्टेबल राजेश बराटे करीत आहेत.