विद्यार्थ्यांना आता आयसीयू तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:42+5:302021-07-04T04:12:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दा दूर करण्यासाठी आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ३० विद्यार्थ्यांना विविध ...

Students are now trained in ICU technology | विद्यार्थ्यांना आता आयसीयू तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना आता आयसीयू तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दा दूर करण्यासाठी आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ३० विद्यार्थ्यांना विविध मशिनरी, आयसीयूची परिस्थिती हाताळणी, व्हेंटिलेटर आदी बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासनाच्या किमान कौशल्यविकास कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

८ जुलै रोजी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व जिल्हा रुग्णालयांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. एकीकडे मनुष्यबळ आहे. मात्र, आवश्यक ते प्रशिक्षण त्याला नसल्याने मनुष्यबळ कमतरता, असा विरोधाभास समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा कौशल्यविकास कार्यक्रमाचा उपक्रम वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयोगाचा ठरणार असल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले. याच्या नियोजनासाठी शनिवारी बैठकही पार पडली असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Students are now trained in ICU technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.