विद्यार्थी भागवताहेत पक्ष्यांची तहान-भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:16 AM2021-04-08T04:16:11+5:302021-04-08T04:16:11+5:30
जळगाव : सध्या उन्हाळा सुरू असून तापमानातसुध्दा कमालीची वाढ झाली आहे. त्यात पक्ष्यांनासुध्दा पाण्यासाठी भटकंती करावे लागते. या रणरणत्या ...
जळगाव : सध्या उन्हाळा सुरू असून तापमानातसुध्दा कमालीची वाढ झाली आहे. त्यात पक्ष्यांनासुध्दा पाण्यासाठी भटकंती करावे लागते. या रणरणत्या उन्हापासून संरक्षण व्हावे व पक्ष्यांची तहान भागावी म्हणून प.वि. पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.
यावेळी उपशिक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पक्ष्यांसाठी मूठभर दाणा व घोटभर पाणी’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या सोयीस्कर ठिकाणी पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था केलेली आहे. टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी सुंदर सुंदर पाण्याच्या परळ तयार केलेल्या असून त्यात ते पक्ष्यांना दाणा-पाणी पुरवत आहे.
उपक्रमात वरुण लोखंडे, रेणुका परदेशी, रितिषा सोनवणे, कार्तिकी कोल्हे, श्रेयस पाटील, पलक तडवी, चिंतनिका पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सर्वोत्कृष्ट परळ तयार केले.