जळगावात विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधला बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2017 04:16 PM2017-01-03T16:16:42+5:302017-01-03T16:16:42+5:30
बंधारा उभारण्यासाठी विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे एकजुटीने श्रमदान केले.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 3 - चाळीसगावातील बीपी आर्टस् , एसएमए सायन्स, केकेसी कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मांदुर्णे येथे श्रमदानातून भला मोठा बंधारा बांधण्याचे काम केले. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडून परिसराला लाभ होणार असल्याने या कामाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसाचे श्रमसंस्कार शिबिर नुकतेच मांदुर्णे येथे पार पडले. या अंतर्गत हे काम झाले.
शिबिराचे उद्घाटन भारतीय सेनेतील जवान ज्ञानेश्वर शिवराम मोरे यांच्या हस्ते झाले. संस्था सचिव वसंतराव चंद्रात्रे, प्राचार्य डॉ.पी.एस.बाविस्कर, हिलाल पवार, मांदुर्णे सरपंच रवींद्र जयराम पाटील, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते. शिबिरातील १२५ विद्यार्थ्यांनी श्रमदानातून मांदुर्णे गावाशेजारील वनविभागाला लागून असलेल्या तलावाच्या वाहून गेलेल्या बांधाच्या उभारणीचे काम केले. ८० फूट लांब ३० फूट रुंद व १५ फूट उंच बांध दगडांनी पिचिंग करुन नव्याने बांधून दिला.
शिबिरात दररोज विविध विषयावर व्याख्याने पार पडली. त्यात गोपाळ नेवे- जादूटोणाविरोधी कायदा, मेहुणबारे पो.स्टे.चे एपीआय दिलीप शिरसाठ- अंधश्रध्दा व गुन्हेगारी, मेहुणबारे पो.स्टे.चे राष्ट्रपती पदक प्राप्त पीएसआय अरविंद देवरे- रस्ता सुरक्षा व सुरक्षित वाहतूक, डॉ.प्रमोद सोनवणे- तंबाखू व टीबी मुक्त भारत, महाराष्ट्र बँक चाळीसगावचे शाखा प्रबंधक प्रवीणकुमार सिंह- लेस कॅश टू कॅशलेस, महाराष्ट्र बँक जळगावचे शाखा प्रबंधक अजय कुमार- कॅशलेस ट्रान्झॅक्शन, डॉ.विनोद कोतकर- अवयवदान, प्रा.साहेबराव घोडे-पे बॅक टू सोसायटी,
सर्पमित्र राजेश ठोंबरे- अंधश्रध्दा निर्मूलन, जुहु पो.स्टे.चे पीएसआय दीपक पाटील- स्पर्धा परीक्षा, उपप्राचार्य दादासाहेब भाटेवाल- पर्यावरण संरक्षण, प्रा.डी.एल.वसईकर- ऊर्जा बचत, डॉ.पी.एस.नन्नवरे- जातीमुक्त समृध्द भारत, प्रा.अप्पासाहेब लोंढे- मुलगी वाचवा-संस्कृती वाचवा, प्रा. एस.डी. भामरे- कॅश लेस सोसायटी व आर्थिक विकास, प्रा.दीपक शुक्ल- रक्तदान श्रेष्ठदान, बाळकृष्ण निकम- कॅशलेस आर्थिक व्यवहार यावर व्याख्याने झाले. रात्रीच्या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
शिबिराला सिनिअर कॉलेज चेअरमन डॉ.एम.बी.पाटील, माजी आ.साहेबराव घोडे, प्रा.जे.बी.पाटील, उपप्राचार्य भिंगारे, प्रा.डॉ.डी. एस.निकुंभ, प्रा.आर.व्ही.जोशी, प्रा.जे.एन.बागूल, प्रा.प्रभाकर पगार, प्रा.रवी पाटील, प्रा.व्ही.आर.बाविस्कर, प्रा.अनिल वाघमारे, प्रा.प्रसाद शिरोडे, प्रा.आर.एम.पाटील, प्रा.मुकेश पाटील, प्रा.प्रदीप रॉय आदींनी भेटी दिल्या.
शिबिर समारोप संस्था उपाध्यक्ष संजय रतनसिंग पाटील यांच्या हस्ते, सचिव वसंतराव चंद्रात्रे, प्राचार्य डॉ.पी.एस.बाविस्कर, हिलाल पवार,सरपंच रवींद्र पाटील, उपसरपंच दीपक वेळीस, ग्रा.पं. सदस्य निहाल मन्सुरी, रंगराव मोगल, प्रा.राजेश चंदनशिव यांच्या उपस्थितीत पार पडला. यशस्वीतेसाठी प्रा.अजय काटे, प्रा.आर.एस.श्रपाटील, प्रा.नितीन नन्नवरे, प्रा.गौतम सदावतो. मधुकर जाधव, जाकीर पिंजारी, अविष्कार जाधव, दीपक चव्हाण, किरण टोकरे, योगेश पाटील, मयूर राजपूत, सुकलाल पाीटल, वाल्मिक महाजन, रोहित महाजन, वैभव माळी, भगवान माळी, सतीश देसले, माधुरी पाटील, वनिता शेंडे, नेहा पाटील, तेजल बोरसे, पूजा पाटी, प्रतीक्षा अहिरराव, प्रियंका सोनवणे,पूनम देवकर आदींनी सहकार्य केले.