यावलमध्ये बौद्ध समाजातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 07:00 PM2018-11-06T19:00:03+5:302018-11-06T19:00:46+5:30

क्रितिका बहुउदेशीय संस्था दहिगाव, ता.यावल व जिल्हा कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्यातर्फे तालुक्यातील बौद्ध समाजातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला.

The students of the Buddhist community are proud of this | यावलमध्ये बौद्ध समाजातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

यावलमध्ये बौद्ध समाजातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Next
ठळक मुद्देस्फूर्ती नगरे इयत्ता बारावी कॉमर्समध्ये प्रथम आल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.यासोबतच इयत्ता दहावीतील ३५, बारावीतील ४८ विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावल, जि.जळगाव : क्रितिका बहुउदेशीय संस्था दहिगाव, ता.यावल व जिल्हा कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्यातर्फे तालुक्यातील बौद्ध समाजातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला.
आमदार हरीभाऊ जावळे अध्यक्षस्थांनी होते. जि.प. सदस्या नंदा सपकाळे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा संपर्कप्रमुख भूषण नगरे, आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय अध्यक्षा मीना तडवी, ए.के.तायडे, आयोजिका संस्थाध्यक्षा मंदा वसंत अडकमोल प्रमुख अतीथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार हरीभाऊ जावळे यांनी सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजास शिका आणि कर्तृत्ववान व्हा, असा मूलमंत्र दिला. त्यांच्या या शिकवणीनुसार समाजातील प्रत्येकाने शिकले पाहिजे.



 

Web Title: The students of the Buddhist community are proud of this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.