विद्यार्थ्यांनी केली डेस्कस्टॉप सिक्युरिटी प्रोव्हाईडर प्रकल्पाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 07:32 PM2020-07-18T19:32:32+5:302020-07-18T19:32:47+5:30

जळगाव : के. सी. ई. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाच्या संगणक शाखेच्या विद्यार्थांनी आपल्या कल्पकतेने डेस्कटॉप सिक्युरीटी प्रोव्हाईडर या प्रकल्पाची ...

Students create a desktop security provider project | विद्यार्थ्यांनी केली डेस्कस्टॉप सिक्युरिटी प्रोव्हाईडर प्रकल्पाची निर्मिती

विद्यार्थ्यांनी केली डेस्कस्टॉप सिक्युरिटी प्रोव्हाईडर प्रकल्पाची निर्मिती

Next

जळगाव : के. सी. ई. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाच्या संगणक शाखेच्या विद्यार्थांनी आपल्या कल्पकतेने डेस्कटॉप सिक्युरीटी प्रोव्हाईडर या प्रकल्पाची निर्मिती केली आहे़ या प्रकल्पात फिंगरप्रिंट उपकरणांद्वारे कॉम्पुटर अतिरिक्त सुरक्षा प्रदान केली जात असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे़
प्रा. लीना राजेश वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री झोपे, प्रशंसा कांकरिया आणि प्रियांका पाटील यांनी हा प्रकल्प पूर्ण केला आहे. यासाठी विभागप्रमुख प्रा. मिनल तुषार कोल्हे आणि प्राचार्य डॉ. के. पी. राणे यांचे सहकार्य लाभले.

असा आहे प्रकल्पाचा फायदा
कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वापरून डेटा चोरला जातो. अशा या गोष्टींना आळा घालण्यासाठी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या प्रकल्पामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती ज्याला आपला पासवर्ड माहित आहे किंवा अंदाज लावून हॅक करून आत जाण्याचा प्रयत्न करत असेल तर या प्रकल्पात फिंगरप्रिंट सारखी अतिरिक्त सुरक्षा लावली आहे. त्यामुळे ती व्यक्ती मूळ साठ्यामध्ये (बॅकअप) जाणार नाही. जरी ती व्यक्ती खूप प्रयत्न करून बॅकअप मध्ये गेली तर त्याची रेकॉर्डिंग होईल तसेच त्या व्यक्तीचा फोटो सुद्धा घेतला जाईल. नंतर ती रेकॉर्डिंग आणि फोटोचा अधिकृत वापरकत्यार्ला मेल आणि मेसेज येईल. त्यामुळे आपला कॉम्पुटर किंवा लॅपटॉप कोणीतरी वापरत आहे असे कळण्यास मदत होईल़् या प्रकल्पामध्ये सुरक्षितेसाठी नॉर्मल प्रोफाईल जनरेशन आणि अटॅक डिटेक्शन मंत्रा एम. एफ. एस. बायोमेट्रिक फिंगरप्रिंटचा वापर करण्यात आला आहे,अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे़

Web Title: Students create a desktop security provider project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.