विद्यार्थ्यांनी बुजविले मेहरूण तलाव मार्गावरील खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:43 PM2019-09-10T12:43:02+5:302019-09-10T12:43:42+5:30
रस्त्याची दुर्दक्षा : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम
जळगाव : गणपती विसर्जन मिरवणुकीत खड्डयांचे विघ्न येऊ नये यासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी मेहरुण तलावाच्या मार्गावरील खड्डे बुलविले़
शहरात ठिकठिकाणी घरगुती गणपती मूर्तींचे येत्या दोन दिवसात विसर्जन होणार आहे. यंदाही बाप्पांच्या मार्गात खड्डयांचे विघ्न दिसत आहे. बाप्पाच्या मार्गावरील खड्डे न बुजल्यास काही भागात बाप्पांचे विसर्जन खड्डेमय रस्त्यातून होईल असे दिसत होते़ त्यामुळे युद्धपातळीवर जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकीच्या विध्याथ्यार्नी एकत्रित येत मेहरूण तलाव नजीकचे खड्डे बुजविले़
दरम्यान, शहरात झालेल्या दमदार पावसांमुळे लहान खड्डे सुध्दा मोठे झाले आहेत़ त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे़ सोमवारी रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याची पाहणी करित मोती आणि दगडांनी खड्डे बुजविले़ दरम्यान, खड्डे बुजविल्यानंतर त्याचा अडथळा निर्माण होऊन नये ते खड्डे बुलविल्यानंतर त्यांचे सपाटीकरण करण्यात आले आहे़ या उपक्रमात महाविद्यालयाचे यश पाटील, ध्रुव अग्रवाल, राजश्री चव्हाण, हर्शल कटपाल, एकनाथ राठोड, पूनम कोळी, जान्हवी चौधरी, मुनीर वाझी आदी विध्याथ्यार्नी सहभाग नोंदविला तसेच रायसोनी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. आर. के. तिवारी, प्रा. एस. एन. पवार, प्रा. आयेशा सय्यद, सौरभ नाईक, आदींनी या उपक्रमासाठी सहकार्य केले़